पनवेल : कळंबोली ते जेएनपीटी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आदेश केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मुंबई येथील बैठकीत दिले आहेत.कळंबोली ते जेएनपीटी महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक झाली. बैठकीस सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भूमिलेख अधिकारी योगेश सावकारे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे असल्याचे गडकरी यांच्या लक्षात आणून दिले.विकास प्रकल्पात समावेशगडकरी यांनी, कळंबोली ते जेएनपीटी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांना आदेश दिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे विकास प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत त्यात जेएनपीटी हायवेचा समावेश आहे.
जेएनपीटी महामार्गाच्या कामाला गती द्या- नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 11:35 PM