भरधाव इको कार चालकाने तिघांना चिरडले; एकाचा मृत्यू
By वैभव गायकर | Published: February 5, 2024 08:46 PM2024-02-05T20:46:25+5:302024-02-05T20:46:39+5:30
कामोठे पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल: भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या इको चालकाने तीन मुलांना चिरडल्याची घटना दि.4 रोजी कामोठ्यात घडली. या घटनेत आर्यन रोकडे हा पाच वर्षांचा कचरावेचक मुलगा मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात कामोठे पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कचरा वेचक महिला अंजली दत्ता साळवे (24) या कामोठे गावामध्ये कचरा वेचून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि.4 रोजी रविवारी सकाळी 11:30 वाजता सुमारास अंजली या स्वतः पती दत्ता व 3 मुलांसह कचरा वेचन्यासाठी सायकलवरून जात असताना रवि साळवे याचा काटा जुईगावच्या गेट जवळ रात्री 1 च्या सुमारास कचरा देऊन मंगल बाळु रोकडे व नधिया प्रदिप साळवे यांच्याबरोबर घरी जाणेसाठी थांबले असतांना जुईगाव गेट्कडुन जुईगाव कडे जाणारी ईको स्कुल व्हॅन चालकानेगा आर्यन रोकडे, मंगल बाळु रोकडे व नधिया प्रदिप साळवे यांना पाठीमागुन जोरात ठोकर माँरून गाडी पुढे लाईटच्या खांबाला जावुन धडकवली.स्कुल बसकडे जात असतांना चालक गाडी सोडून पळुन गेला. सदर ईको स्कूल बस क्र. एमएच 43 बीबी 3418 या क्रमांकाच्या इको चालकाने दिलेल्या धडकेने जखमी झालेल्या आर्यन, मंगल व नधिया यांना बाहेर काढुन एमजीएम हॉस्पीटलमध्ये दवाउपचाराठी दाखल केले.
एमजीएम हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी यावेळी आर्यन रोकडे (9) यास मृत्य घोषित केले.तर मंगल बाळु रोकडे व नधिया प्रदिप साळवे यांच्यावर उपचार सुरू आहेत.यावेळी व्हॅन चालक कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न देता पळून गेल्याने त्याच्यावर कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.