नवी मुंबई : आॅगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील दुकाने सजली असून, गेल्या दोन दिवसांपासून तरुणांनी खरेदीसाठी गिफ्ट शॉपमध्ये गर्दी केली आहे. विविध रंगाचे फ्रेंडशीप बॅण्ड, भेटकार्ड, मैत्रीची व्याख्या स्पष्ट करणाºया भेटवस्तू, किचेन्स खरेदी करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे.महाविद्यालयीन आयुष्यात मैत्रीला सर्वात अधिक प्राधान्य दिले जात असून, एकमेकांना फ्रेंडशिप बॅण्ड बांधून आणि विविध भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतात. महाविद्यालयांमध्येही या काळामध्ये साडी डे, रोझ डे, चॉकलेट डे, ट्रॅडिशनल डे असे विविध डेज साजरे करण्याचे क्रेझ वाढले आहे. नुकतेच अॅडमिशन घेऊन विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू झालेले असून, यात नवीन मित्र-मैत्रिणींचे अनेक ग्रुप तयार झाले असून, फ्रेंडशिप डे कसा साजरा करायचा? याचे प्लॅन्सही कॉलेज कट्ट्यावर रंगविण्यात येतात. सेलिब्रेट करण्याचे प्लॅन्स बनवतात. फ्रेंडशिप डेनिमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या असून, अनेक दुकानांमध्ये मनगटावर बांधण्यासाठी रंगीबेरंगी बॅण्ड्स विक्र ीसाठी उपलब्ध आहेत. अगदी पाच रु पयांपासून ४५० रु पयांपर्यंत या बॅण्ड्सच्या किमती आहेत. त्याचबरोबर जवळच्या मित्राला भेटवस्तू देण्याकरिता भेटकार्ड, आकर्षक पॅकिंगमध्ये चॉकलेट्स, किचेन्स, पुस्तक, फोटोंचे कोलाज, मित्रासोबतचा सेल्फी असलेला टी मग आदी वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. सुट्टीमुळे अनेकांनी सहल, गेट टू गेदर असा बेत आखला आहे.
फ्रेंडशिप डेनिमित्त भेटवस्तू खरेदीला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 4:00 AM