‘लोकमत’ अॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:28 AM2018-08-20T04:28:15+5:302018-08-20T04:28:34+5:30
‘अॅमेझॉन साधी गोष्ट’ या उपक्रमास शहरातील खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली येथे तुफान प्रतिसाद मिळाला.
नवी मुंबई : नव्या युगात खरेदीचा नवा पर्याय, हवे ते उत्पादन पसंत करा अन् तुमच्या दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटा. त्यासाठी ‘अॅमेझॉन साधी गोष्ट’ या उपक्रमास शहरातील खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली येथे तुफान प्रतिसाद मिळाला. ‘अॅमेझॉन साधी गोष्ट’ शिका आॅनलाइन शॉपिंग सहजपणे, हा फंडा घेऊन आलेल्या उपक्रमास शहरात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमात पूर्वीपासून ज्यांच्याकडे अॅप आहे, अशांवरही बक्षिसांची बरसात केलेली आहे. तसेच खेळात सहभागी होऊन तीन हजार रुपये किमतीचे गिफ्ट कार्ड जिंकण्याची संधी मिळणार आहे. ‘अॅमेझॉन साधी गोष्ट’ या जनजागृतीच्या उपक्रमात युवक-युवतींनी गर्दी केलीे. अनेकांनी स्मार्ट फोनवर ‘अॅमेझॉन अॅप’ डाउनलोड केले आहे.
तुम्ही अनेक कार्ड्समधून निवड करून समान मासिक हप्त्यांमध्ये तुमची आॅर्डर पे करू शकता. त्यात विविध प्रकारची १५ कोटींहून अधिक उत्पादनांसाठी एकाच जागी निवडीची संधी पाहून नवीन ग्राहकही भारावले आहेत. यासाठी ग्राहकांना ‘अॅप’ डाउनलोड करण्यासाठी निवेदकांनी हसत-खेळत आपल्या खास शैलीतून मनोरंजन केले.
कॅश आॅन डिलिव्हरी : तुमची आॅर्डर द्या आणि आॅर्डर आल्यावर पैसे द्या. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. ‘कॅश आॅन डिलिव्हरी’साठी पात्र अशी खूण असलेल्या सर्व उत्पादनांसाठी तुम्ही रोख पैसे देऊ शकता. लोकांच्या मनातील शंका इथे दूर होऊ शकतात. ‘अॅमेझॉन अॅप’ वापरायला मी सुरुवात कशी करावी, योग्य उत्पादन निवडले आहे हे मला कसे कळेल, योग्य उत्पादन सापडल्यानंतर मी पैसे कसे द्यायचे, मला उत्पादन परत करायचे असल्यास ते कसे परत करायचे, अशा विविध प्रश्नांचे समाधान इथे केले जात आहे. त्यामुळे ग्राहक समाधानी होत आहेत.