नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद पडलेले विमानतळाचे काम शनिवारपासून पुन्हा सुरू करण्यात आले. या कामात पुन्हा अडथळा येऊ नय,े यासाठी या ठिकाणी एसआरपीच्या चार तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी प्रकल्पग्रस्तांबरोबर झालेल्या सकारात्मक बैठकीतनंतर सिडकोने हा निर्णय घेतला आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित शेतकºयांच्या पुनर्वसनाबरोबरच अन्य प्रलंबित मागण्या पुढील चार महिन्यांत सोडविण्याच्या आश्वासनानंतर प्रकल्पग्रस्तांनी बंद पडलेल्या प्रकल्पपूर्व कामांना शुक्रवारच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार सिडकोने शनिवारपासून कामाला पुन्हा सुरुवात केली. असे असले तरी कामे सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कामात अडथळा निर्माण होऊ नये, यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून एसआरपीच्या चार तुकड्या येथे तैनात ठेवल्या आहेत. शुक्रवारी बैठक संपल्यानंतर लगेच या एसआरपीच्या पथकाने काम सुरू असलेल्या ठिकाणी संचालन केले. त्यानंतर शनिवार सकाळपासून काम पूर्ववत सुरू करण्यात आले. हा राष्ट्रीय प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी यापुढे देखील प्रकल्पग्रस्तांनी सहकार्य करण्याचे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी केले आहे. कोणाच्या भूलथापांना बळी पडून विमानतळाच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास नाइलाजास्तव पोलीस बळाचा वापर केला जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी विरोध करणाºयांना दिला आहे. सिडकोच्या ताठर व तितक्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्तांनी नमते घेत प्रलंबित मागण्या पुढील चार महिन्यांत पूर्ण करण्याच्या अटीवर विमानतळाच्या कामाला परवानगी दिली आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाºया आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील प्रमुख अडथळा दूर झाल्याचे बोलले जात आहे.
एसआरपीसह कडक पोलीस बंदोबस्तात विमानतळाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 1:01 AM