ट्रेलरला धडक दिल्याने एसटी चालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 07:03 AM2022-07-24T07:03:53+5:302022-07-24T07:04:15+5:30
पुणे-मुंबई महामार्गावर मुंबई लाईन किलोमीटर १०.५०० जवळ कोनगाव येथे घडला. अशोक अच्युत गायके (वय ३३) असे मृत एसटी चालकाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : बंद पडलेल्या ट्रेलरला एसटीने शनिवारी पहाटे अडीच वाजता पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-मुंबई महामार्गावर मुंबई लाईन किलोमीटर १०.५०० जवळ कोनगाव येथे घडला. अशोक अच्युत गायके (वय ३३) असे मृत एसटी चालकाचे नाव आहे.
सुधाकर कोन्हाळे हे एसटीतील प्रवासी आहेत. त्यांनी सांगितले की, एसटी महामंडळाची सोलापूर ते अर्नाळा विरार जाणारी बस ही पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाने जात असताना ट्रेलर चालकाने बंद पडलेला ट्रेलर रस्त्यावर धोकादायक व असुरक्षित अवस्थेत उभा केला होता. शनिवारी पहाटे अडीच वाजता पुणे-मुंबई महामार्गावर मुंबई लेन किलोमीटर १०.५०० जवळ कोनगाव येथे एसटीने बंद पडलेल्या ट्रेलरला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात एसटी बसमधील १८ प्रवासी जखमी झाले. यात दोन्ही वाहनांचे नुकसान होऊन एसटी चालक गायके हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात ट्रेलर व एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.