वाशी खाडीपुलांवरील आत्महत्यांवर स्टेनलेस स्टीलच्या जाळीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:58 AM2019-01-01T02:58:11+5:302019-01-01T02:58:37+5:30

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्वात जुन्या वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्या करणाºयांचे वा तसा प्रयत्न करणा-यांचे प्रमाण अलीकडे वाढीस लागले होते. मात्र, असे प्रकार रोखण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे.

 Stainless Steel Nets Extraction on Suicide on Vashi Gulf | वाशी खाडीपुलांवरील आत्महत्यांवर स्टेनलेस स्टीलच्या जाळीचा उतारा

वाशी खाडीपुलांवरील आत्महत्यांवर स्टेनलेस स्टीलच्या जाळीचा उतारा

googlenewsNext

- नारायण जाधव

ठाणे : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्वात जुन्या वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्या करणा-यांचे वा तसा प्रयत्न करणा-यांचे प्रमाण अलीकडे वाढीस लागले होते. मात्र, असे प्रकार रोखण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे.
नव्या वर्षात येथील जुन्या पुलासह नव्या पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर अशी स्टेनलेस स्टीलची जाळी बसविण्यात येणार आहे. ती बसविल्यानंतर या पुलांवरून उडी मारून आत्महत्या करणाºयांचे प्रमाण पूर्ण थांबणार आहे. नव्या वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल.
वाशी खाडीपूल हा खाडीवरील सर्वात लांब पूल असून त्याची लांबी १८६३ मीटर इतकी आहे. यातील जुन्या पुलाचे बांधकाम १९७३ मध्ये झाले. मात्र, कालांतराने हा पूल जीर्ण झाल्याने त्याला लागूनच एकीकडे रेल्वे पूल आणि दुसºया बाजूला समांतर अशा नव्या खाडीपुलाचे काम सुरू झाले. नव्या खाडीपुलाचे काम १९८७ ते १९९७ मध्ये झाल्यानंतर तो वाहतुकीसाठी सुरू झाला. नवीन सहापदरी पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जुना खाडीपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला. मात्र, खाडीवरील या पुलावरून पायी चालणे, वाहन चालविण्याचा आनंद घेणे याचे सुरुवातीला सर्वांना आकर्षण होते. हेच आकर्षण पुढे काही नैराश्य आलेल्यांसाठी शाप बनू लागले. काही जण जुन्या पुलावर येऊन तेथून खाडीत उडी घेऊन आत्महत्या करू लागले. यात नजीकच्या वाशीगावातील मच्छीमार तरुणांमुळे काहींचे प्राण वाचविण्यात यश आले असले तरी त्यात काहींचा जीव गेला आहे. यामुळे पोलिसांकडून या पुलाच्या दोन्ही बाजूस जाळी किंवा ग्रिल बसविण्याची मागणी होत होती.

दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूस १,८६३ मीटरची जाळी
अलीकडे आत्महत्या करणा-यांचे वा तसा प्रयत्न करणा-यांचे प्रमाण वाढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक अधिकाºयांनी यात पुढाकार घेऊन तसा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविला. त्यास सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर या पुलाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत बांगर यांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.
सध्या त्याचे डिझाइन तयार झाले असून दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी १८६३ मीटरची जाळी बसविण्यात येणार आहे. या कामावर सुुरुवातील तीन ते साडेतीन कोटी खर्च होणार आहे.

Web Title:  Stainless Steel Nets Extraction on Suicide on Vashi Gulf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.