लुटमारी करणाऱ्या तृतीयपंथींना अटक

By admin | Published: December 23, 2016 03:33 AM2016-12-23T03:33:31+5:302016-12-23T03:33:31+5:30

सायन-पनवेल मार्गालगत, तसेच वाशी रेल्वेस्थानकाभोवती वेश्याव्यवसायाच्या बहाण्याने लुटमारी करणाऱ्या नऊ तृतीयपंथींना

Stalking third-party arrests | लुटमारी करणाऱ्या तृतीयपंथींना अटक

लुटमारी करणाऱ्या तृतीयपंथींना अटक

Next

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गालगत, तसेच वाशी रेल्वेस्थानकाभोवती वेश्याव्यवसायाच्या बहाण्याने लुटमारी करणाऱ्या नऊ तृतीयपंथींना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. ते सर्व जण मुंबईचे राहणारे असून, गुन्हेगारीच्या उद्देशाने नवी मुंबईत यायचे. ठिकठिकाणी सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यांचे ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांनी ‘त्या’ ठिकाणांवर छापे टाकण्याला सुरुवात केली आहे.
देहविक्री करणाऱ्या महिला व तृतीयपंथींनी शहरात ठिकठिकाणी वेश्याव्यवसायाचे अड्डे सुरू केले आहेत. त्यांच्याकडून उघड्यावर होणाऱ्या अश्लील कृत्यांमुळे त्या ठिकाणांवरून जाणाऱ्या सर्वसामान्य महिला-पुरुषांची कुचंबणा होत आहे. तर अशा ठिकाणी एकांताच्या वेळी पादचाऱ्याला लुटण्याचे प्रकारही घडायचे. त्यामुळे आधुनिकतेची कास धरून वाढणाऱ्या नवी मुंबई शहराला गालबोट लागत चालले आहे. यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने ‘हॅलो नवी मुंबई’च्या अंकात प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत, पोलिसांनी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्याला सुरुवात केली आहे. या दरम्यान, वाशी पोलिसांनी दोन दिवस केलेल्या धडक कारवाईत नऊ तृतीयपंथीयांना अटक केली आहे. ते सर्व जण मुंबईचे राहणारे असून, देहविक्रीच्या बहाण्याने ट्रकचालकांना लुटण्याकरिता यायचे. त्यांनी सायन-पनवेल मार्गावर सानपाडा सिग्नल ते वाशी सिग्नल दरम्यान झाडीमध्ये वेश्याव्यवसायाचा अड्डा केला होता. ट्रक टर्मिनलमध्ये ट्रक पार्किंगसाठी येणाऱ्या चालकांसोबत त्यांची अश्लील कृत्ये चालायची. त्यापैकीच काहींनी रघुलीला मॉल समोरील वाशी रेल्वेस्थानकालगतच्या झाडीमध्ये देहविक्रीचा अनैतिक धंदा चालवला होता. त्या ठिकाणी सलग दोन दिवस कारवाई करून, नऊ तृतीयपंथींना अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Stalking third-party arrests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.