शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

लुटमारी करणाऱ्या तृतीयपंथींना अटक

By admin | Published: December 23, 2016 3:33 AM

सायन-पनवेल मार्गालगत, तसेच वाशी रेल्वेस्थानकाभोवती वेश्याव्यवसायाच्या बहाण्याने लुटमारी करणाऱ्या नऊ तृतीयपंथींना

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गालगत, तसेच वाशी रेल्वेस्थानकाभोवती वेश्याव्यवसायाच्या बहाण्याने लुटमारी करणाऱ्या नऊ तृतीयपंथींना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. ते सर्व जण मुंबईचे राहणारे असून, गुन्हेगारीच्या उद्देशाने नवी मुंबईत यायचे. ठिकठिकाणी सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यांचे ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांनी ‘त्या’ ठिकाणांवर छापे टाकण्याला सुरुवात केली आहे.देहविक्री करणाऱ्या महिला व तृतीयपंथींनी शहरात ठिकठिकाणी वेश्याव्यवसायाचे अड्डे सुरू केले आहेत. त्यांच्याकडून उघड्यावर होणाऱ्या अश्लील कृत्यांमुळे त्या ठिकाणांवरून जाणाऱ्या सर्वसामान्य महिला-पुरुषांची कुचंबणा होत आहे. तर अशा ठिकाणी एकांताच्या वेळी पादचाऱ्याला लुटण्याचे प्रकारही घडायचे. त्यामुळे आधुनिकतेची कास धरून वाढणाऱ्या नवी मुंबई शहराला गालबोट लागत चालले आहे. यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने ‘हॅलो नवी मुंबई’च्या अंकात प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत, पोलिसांनी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्याला सुरुवात केली आहे. या दरम्यान, वाशी पोलिसांनी दोन दिवस केलेल्या धडक कारवाईत नऊ तृतीयपंथीयांना अटक केली आहे. ते सर्व जण मुंबईचे राहणारे असून, देहविक्रीच्या बहाण्याने ट्रकचालकांना लुटण्याकरिता यायचे. त्यांनी सायन-पनवेल मार्गावर सानपाडा सिग्नल ते वाशी सिग्नल दरम्यान झाडीमध्ये वेश्याव्यवसायाचा अड्डा केला होता. ट्रक टर्मिनलमध्ये ट्रक पार्किंगसाठी येणाऱ्या चालकांसोबत त्यांची अश्लील कृत्ये चालायची. त्यापैकीच काहींनी रघुलीला मॉल समोरील वाशी रेल्वेस्थानकालगतच्या झाडीमध्ये देहविक्रीचा अनैतिक धंदा चालवला होता. त्या ठिकाणी सलग दोन दिवस कारवाई करून, नऊ तृतीयपंथींना अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)