शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

रखडलेले प्रकल्प उद्यापासून सुरू, सिडकोनेपही कंबर कसली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 11:44 PM

सिडकोने कंबर कसली । लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याचा फायदा

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे सिडकोचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठप्प पडले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, नेरूळ-उरण रेल्वेचा दुसरा टप्पा, खारघर ते आम्रमार्ग दरम्यान कोस्टल रोड आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मागील दोन-अडीच महिन्यांपासून खीळ बसली आहे. परंतु पाचव्या लॉकडाउनमध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आल्याने रखडलेल्या सर्व प्रकल्पांवर विशेष लक्ष देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी मेट्रोची चाचणी घेण्यात आली. उर्वरित कामे हाताबाहेर करून डिसेंबर २0२0 पर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याची सिडकोची योजना आहे. त्यानुसार लॉकडाउनमध्येही सोशल डिस्टन्सचे नियम पाळून प्रकल्पाचे काम सुरू ठेवले होते. यासाठी सुमारे २00 मजूर तैनात ठेवले होते. परंतु यातील अनेक मजुरांनी स्थलांतर केल्याने हे काम रखडले आहे.

शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मेट्रोच्या प्रकल्पाला मात्र मजूरवर्गाअभावी खीळ बसली आहे. संबंधित कंत्राटदारांना मजूर उपलब्ध करण्यास अपयश आल्याने सुरू केलेले हे काम पुन्हा बंद करण्याची नामुश्की सिडकोवर ओढावली होती. परंतु संबंधित कंत्राटदाराने आता हा प्रश्नसुद्धा निकाली काढल्याने लवकरच मेट्रोच्या कामालासुद्धा सुरुवात केली जाईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.लॉकडाऊनमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामसुद्धा सुरू करण्यात आले होते. मात्र मजुरांअभावी हे कामसुद्धा बंद करावे लागले. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. पुरेसा मजूरवर्ग उपलब्ध करण्यातसुद्धा संबंधित कंत्राटदारांना यश आले आहे. त्यामुळे साधारण सोमवारपासून विमानतळासह मेट्रो, कोस्टल रोड आदींसह विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.सोमवारपासून शासकीय कार्यालयांत १५ टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची अनुमती मिळाली आहे. सध्या सिडकोच्या सर्व नागरी सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिडको कार्यालयात नागरिकांच्या भेटीगाठींना कात्री लागली आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या बळावर रखडलेल्या विकास प्रकल्पांना गती देणे शक्य असल्याचा विश्वास सिडकोच्या सूत्राने व्यक्त केला आहे.1उरण : जेएनपीटी बल्क टर्मिनलने मे २०२० मध्ये एकूण ६,५०,९४२ मेट्रिक टन द्रवपदार्थाची हाताळणी केली आहे. मागील वर्षी मे २०१९ मध्ये ५,७४,६६४ मेट्रिक टन द्रवपदार्थाची हाताळणी केली होती. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी १३.३ टक्के वाढ झाली असल्याची माहिती जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली.2लॉकडाऊन कालावधीतही जेएनपीटी अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून निरंतर कार्यरत आहे. ३१ मे रोजी जेएनपीटीने ओएनजीसीचे ८६,४७७.९६९ मेट्रिक टन ‘क्रूड आॅइल’ बंदरातून लोडिंग केले आहे. जेएनपीटी नियमितपणे एलपीजी, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरीट, नेफ्था, क्रूड आॅइलसह विविध पेट्रोलियम पदार्थ बीपीसीएल लिक्विड कार्गो जेटीद्वारे हाताळणी करते.3जेएनपीटीने कंटेनर हाताळणीमध्ये २,७४,७५० टीईयूचा व्यवसाय केला आहे. जेएनपीटीने मे २०१९ मध्ये ४२० कंटेनर ट्रेन्स हाताळल्या होत्या. तर या वर्षी मे २०२० या महिन्यात जेएनपीटीने ४४५ कंटेनर ट्रेन्स हाताळल्या आहेत. गेल्या वर्षी गुणांक १४.९१ टक्के होता. या वर्षी रेल्वे गुणांकामध्ये वाढ होऊन तो २३.७० टक्के झाला आहे.4जेएनपीटी कंटेनर टर्मिनलने ६ मे २०२० पासून रिकाम्या कंटेनरची ट्रेन आयसीडी दहेजला पाठविण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. याच उपक्रमातून परत येताना हाजिरा येथून रिलायन्स इंडस्ट्रीजचा निर्यातीसाठीचा माल आणला जात आहे. यामध्ये दुहेरी फायदा होतो, अशी माहितीही जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcidcoसिडको