अर्थसंकल्पात स्थायी समितीची १७३ कोटी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:31 PM2019-02-26T23:31:05+5:302019-02-26T23:31:08+5:30

अंदाजपत्रक ३६२९ कोटींचे : सर्वसाधारण सभेत मिळणार अंतिम मंजुरी

The Standing Committee has increased its budget by 173 crore | अर्थसंकल्पात स्थायी समितीची १७३ कोटी वाढ

अर्थसंकल्पात स्थायी समितीची १७३ कोटी वाढ

Next

नवी मुंबई : आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये स्थायी समितीने तब्बल १७३ कोटी ८० लाख रुपयांची वाढ केली आहे. एकूण ३६२९ कोटी ४४ लाख ४४ हजार रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. अंतिम मंजुरीसाठी अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला जाणार असून तेथे किती वाढ केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


आयुक्त रामास्वामी एन. यांनी १६ फेब्रुवारीला स्थायी समितीमध्ये ३४५५ कोटी ६४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. यावर दोन दिवस सर्व सदस्यांनी चर्चा केली. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये विकासकामांसाठी तरतूद केली जाते; परंतु अनेक महत्त्वाचे प्रकल्प कागदावरच रहात आहेत. अत्यावश्यक गोष्टींवरही पूर्ण खर्च केला जात नाही. आरोग्य,शिक्षण व शहरहिताच्या अनेक कामांसाठी तरतूद असताना खर्च होत नसल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. अंदाजपत्रक चांगले असले तरी त्याची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. आयुक्तांनी सुचविलेल्या अंदाजामध्ये स्थायी समिती सदस्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ सुचविली.
 

स्थायी समितीच्या सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करताना अनमोल सूचना केल्या आहेत. महापालिकेला उत्पन्नवाढीसाठी खूप स्कोप आहे. अर्थसंकल्पात पाणीपुरवठ्याचे दर वाढविलेले नाहीत. पाण्याचे लिकेज थांबविण्यावर भर दिला आहे. पाणी लिकेजचे प्रमाण कमी असलेल्या शहरात नवी मुंबई हे शहर पहिल्या क्र मांकावर आहे. शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार असून, यामुळे नक्कीच मालमत्ता करात वाढ होईल.
- डॉ. रामास्वामी एन.,
महापालिका आयुक्त

नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, परिवहनसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरवासीयांच्या गरजा व भविष्याचा वेध घेऊन अर्थसंकल्प तयार केला आहे.
- सुरेश कुलकर्णी,
सभापती, स्थायी समिती

Web Title: The Standing Committee has increased its budget by 173 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.