शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अर्थसंकल्पात स्थायी समितीची १७३ कोटी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:31 PM

अंदाजपत्रक ३६२९ कोटींचे : सर्वसाधारण सभेत मिळणार अंतिम मंजुरी

नवी मुंबई : आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये स्थायी समितीने तब्बल १७३ कोटी ८० लाख रुपयांची वाढ केली आहे. एकूण ३६२९ कोटी ४४ लाख ४४ हजार रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. अंतिम मंजुरीसाठी अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला जाणार असून तेथे किती वाढ केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयुक्त रामास्वामी एन. यांनी १६ फेब्रुवारीला स्थायी समितीमध्ये ३४५५ कोटी ६४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. यावर दोन दिवस सर्व सदस्यांनी चर्चा केली. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये विकासकामांसाठी तरतूद केली जाते; परंतु अनेक महत्त्वाचे प्रकल्प कागदावरच रहात आहेत. अत्यावश्यक गोष्टींवरही पूर्ण खर्च केला जात नाही. आरोग्य,शिक्षण व शहरहिताच्या अनेक कामांसाठी तरतूद असताना खर्च होत नसल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. अंदाजपत्रक चांगले असले तरी त्याची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. आयुक्तांनी सुचविलेल्या अंदाजामध्ये स्थायी समिती सदस्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ सुचविली. 

स्थायी समितीच्या सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करताना अनमोल सूचना केल्या आहेत. महापालिकेला उत्पन्नवाढीसाठी खूप स्कोप आहे. अर्थसंकल्पात पाणीपुरवठ्याचे दर वाढविलेले नाहीत. पाण्याचे लिकेज थांबविण्यावर भर दिला आहे. पाणी लिकेजचे प्रमाण कमी असलेल्या शहरात नवी मुंबई हे शहर पहिल्या क्र मांकावर आहे. शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार असून, यामुळे नक्कीच मालमत्ता करात वाढ होईल.- डॉ. रामास्वामी एन.,महापालिका आयुक्तनवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, परिवहनसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरवासीयांच्या गरजा व भविष्याचा वेध घेऊन अर्थसंकल्प तयार केला आहे.- सुरेश कुलकर्णी,सभापती, स्थायी समिती