दहावीची कलमापन चाचणी सुरू
By Admin | Published: February 18, 2017 04:12 AM2017-02-18T04:12:19+5:302017-02-18T04:12:19+5:30
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एसएससी) विद्यार्थ्यांसाठी पहिल्या आॅनलाइन अभियोग्यता चाचणीला गुरुवारपासून सुरूवात झाली
नवी मुंबई : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एसएससी) विद्यार्थ्यांसाठी पहिल्या आॅनलाइन अभियोग्यता चाचणीला गुरुवारपासून सुरूवात झाली. विद्यार्थ्यांचा कल कोणत्या विषयात आहे, हे जाणून घेण्याकरिता शिक्षण मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे.
कलचाचणी आॅनलाइन अभियोग्यता परीक्षा ३ मार्च २०१७ पर्यंत सुरू राहणार आहे. मुंबई विभाग शिक्षण मंडळ, तसेच व्यावसायिक प्रशिक्षण विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या या चाचणीला गुरूवारी १५ हजार ८७२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. राज्यभरात आॅनलाइन पध्दतीने ही चाचणी घेतली जात आहे. आॅनलाइन परीक्षेची सोय नसलेल्या केंद्रावर आॅफलाइनही परीक्षा घेतली जाईल. (प्रतिनिधी)