पनवेलमधील गाढी नदीच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 01:58 AM2019-05-02T01:58:44+5:302019-05-02T01:59:11+5:30

निसर्ग मित्र संघटनेचा पुढाकार : जनजागृतीवर भर; चित्रीकरण प्रशासनाला सादर करणार

Start the cleaning campaign of Gadhhi river in Panvel | पनवेलमधील गाढी नदीच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात

पनवेलमधील गाढी नदीच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात

Next

पनवेल : तालुक्यातील गाढी नदी कचऱ्याच्या समस्येमुळे प्रदूषित झाली आहे. ठिकठिकाणी नदीत टाकत असलेल्या कचºयामुळे गाढी नदीची दुरवस्था झाली आहे. गाढी नदीच्या परिसरात निसर्ग मित्र संघटनेच्या वतीने १ मे रोजी येथील चिपळे पुलाखालील मोठ्या प्रमाणातील कचरा काढून टाकण्यात आला.

पनवेल तालुक्यात नागरीकीकरण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ठिकठिकाणचा कचरा गाढी नदीत टाकला जात आहे. त्यामुळे या नदीचे रूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. चिपळे येथील ब्रिजखाली निर्माल्य, प्लॅस्टिक पिशव्या, जलपर्णी, दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या आदीचा खच पडलेला दिसत आहे. कचरा कुजल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. तसेच आजूबाजूच्या नागरी वसाहतीतील सांडपाणीदेखील गाढी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे गाढी नदीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दवाखान्यातील कचरा, इंजेक्शन्स, औषधांच्या बाटल्या, मलमपट्टी, गोळ्यांचे खोके आदी सर्व टाकाऊ (मेडिकल वेस्टेज मटेरीयल) पदार्थ गाढी नदी परिसरात टाकले जात आहे. निसर्ग मित्र संघटनेने गुढी पाडव्यापासून गाढी नदीच्या परिसराची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी संघटनेचे ४० हून अधिक सभासद एकत्र येऊन चिपळे पुलाखाली परिसर स्वच्छ केला. पुलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. कचºयाच्या सुमारे २५ ते ३0 पिशव्या भरून त्याची इतरत्र विल्हेवाट लावल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी दिली.

स्वच्छतेसाठी घंटागाडीची मदत
निसर्ग मित्र संघटला चिपळे व आकुर्ली ग्रामपंचायततर्फे कचरा वाहून नेण्यासाठी घंटगाडीची मदत करण्यात आली. पावसाळा सुरू होईपर्यंत ही स्वच्छता मोहीम सुरू राहणार असून या गाढी नदीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात गाढी नदी कशी दिसते व पावसाळ्यानंतर कशी दुर्दशा होते याचे चित्रीकरण करून ते संबंधित प्रशासनाला दाखविण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना सांगितले.

Web Title: Start the cleaning campaign of Gadhhi river in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.