पनवेल : नवीन पनवेलमधील पोदी येथून पनवेलकडे जाण्यासाठी रेल्वे गेट आहे. हा रस्ता महामार्गावर जाण्यासाठी जवळ पडतो. या ठिकाणी पनवेल रेल्वे स्टेशनचा विकास करताना पूल बांधण्याची किंवा भुयारी मार्ग करण्याची मागणी रहिवाशांच्या वतीने अॅड. मनोज भुजबळ यांनी केली होती. रेल्वेने भुयारी मार्गाच्या कामाला फेब्रुवारी महिन्यात सुरवात केली आहे. त्याची पाहणी माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत व मनोज भुजबळ यांनी शुक्र वारी केली. नवीन पनवेलमधील सेक्टर १५, १५ए , पोदी नं.१ व विचुंबे या भागातून राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पोदीजवळील रेल्वे गेट ओलांडून किंवा एच.डी. एफ. सी. सर्कलच्या पुलावरून जावे लागते. या पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. माथेरानकडे जाणारा मार्ग येथूनच पुढे जातो. शिवाय डीमार्टकडून येणारी वाहतूक ही या पुलावरून सुरू असते. परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून पोदीजवळ असलेल्या रेल्वे गेटचा वापर धोकादायक ठरत आहे.
भुयारी मार्गाचे काम सुरू
By admin | Published: March 28, 2017 6:12 AM