पालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
By Admin | Published: April 29, 2017 01:57 AM2017-04-29T01:57:49+5:302017-04-29T01:57:49+5:30
महापालिका निवडणुकीसाठी २९ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी मनपा क्षेत्रांमध्ये
पनवेल : महापालिका निवडणुकीसाठी २९ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी मनपा क्षेत्रांमध्ये सहा ठिकाणी अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी पोलीस, पालिका व निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. उमेदवारी अर्ज भरताना गोंधळ होऊ नये यासाठी केंद्रामध्ये उमेदवारासह जास्तीत जास्त पाच जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या २० प्रभागात ७८ जागांसाठी निवडणुका होत आहेत. याकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत सहा निवडणूक निर्णय अधिकारी नेमले आहेत. प्रभाग क्र मांक १, २, ३ साठी डी. एन. भनकवाड (उपविभागीय अधिकारी, कर्जत) हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असणार आहेत. नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे व आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज या ठिकाणी त्यांचे कार्यालय असणार आहे. प्रभाग क्र मांक ४,५,६साठी हरिश्चंद्र पाटील (उपजिल्हाधिकारी, बोरीवली) यांची नियुक्ती केली आहे. खारघर सेक्टर ११मधील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात या तीन विभागांची निवडणूक कार्यालये असणार आहेत. प्रभाग क्र मांक ७, ८, ९, १० साठी उपेंद्र तामोरे (उपजिल्हाधिकारी, भांडुप) हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. श्री काळभैरव मंगल कार्यालय इमारत कळंबोली या ठिकाणी हे निवडणूक कार्यालय असणार आहे. प्रभाग क्र मांक ११,१२,१३ साठी तेजस समेळ (उपजिल्हाधिकारी भांडुप) हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, रयत शिक्षण संस्थेच न्यू इंग्लिश स्कूल कामोठे या ठिकाणी हे निवडणूक कार्यालय असणार आहे. प्रभाग क्र मांक १४,१५,१६साठी श्रीधर बोधे (उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे) हे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. कोकण एज्युकेशन सोसायटीचे के. व्ही. कन्याशाळेत हे कार्यालय असणार आहेत. प्रभाग क्र मांक १७,१८,१९,२० साठी ज्ञानेश्वर खुटवड (अतिरिक्त उपजिल्हाधिकारी) हे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. कोकण एज्युकेशन सोसायटीचे इंदाबाई वाजेकर इंग्रजी माध्यमिक शाळा पनवेल या ठिकाणी या प्रभागाचे निवडणूक कार्यालय असणार आहे.