राज्य उत्पादन शुल्क विभागाची पनवेल मध्ये धडक कारवाईत ;1 कोटी गांजासह वाहन केले हस्तगत

By वैभव गायकर | Published: June 13, 2024 07:00 PM2024-06-13T19:00:27+5:302024-06-13T19:00:58+5:30

याप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

State Excise Department's raid in Panvel seized a vehicle with 1 crore ganja | राज्य उत्पादन शुल्क विभागाची पनवेल मध्ये धडक कारवाईत ;1 कोटी गांजासह वाहन केले हस्तगत

राज्य उत्पादन शुल्क विभागाची पनवेल मध्ये धडक कारवाईत ;1 कोटी गांजासह वाहन केले हस्तगत

वैभव गायकर,पनवेल, राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा येथे केलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपये किंमतीच्या गांजासह वाहन हस्तगत केले. तसेच याप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2, पनवेल या कार्यालयास मिळालेल्या माहितीनुसार पनवेल मुंब्रा महामार्गाच्या डाव्या बाजुस स्टार वेल्डींग वर्कसच्या समोर, तळोजे पाचनंद तळोजे येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठा साठा वाहतुकी होणार होती . त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी ,प्रसाद सुर्वे ,प्रदिप पवार या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात राज्य जिल्हा अधीक्षक आर. आर. कोले, निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, तसेच सहा. दु. नि. जी. सी. पालवे, महिला जवान आर. डी. कांबळे, श्रीमती. निशा ठाकुर, जवान ज्ञानेश्‍वर पोटे, सचिन कदम आदींच्या पथकाने त्या ठिकाणी पाळत ठेवून  छापा टाकला असता एक महिन्द्रा कंपनीची गाडी तेथे आली व या गाडीमध्ये आरिफ जाकीर शेख (25),परवेझ बाबुअली शेख (29) दोघे राहणार सायन कोळीवाडा  यांच्या ताबे कब्जात पांढर्‍या रंगाच्या नायलॉन गोण्यामध्ये 414 किलो अंदाजे 1 कोटी रूपयांपेक्षा जास्त किमंतीचा गांजाचा साठा मिळून आला. सदर आरोपी इसमांच्या कब्जातून एकुण 1 कोटी13 लाख 90 हजार किमंतीचा गांजा, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल एनडीपीएस कायदा 1985 अन्वये जप्त केला. व त्यांना अटक करण्यात आली आहे व त्यांच्या विरोधात एन.डी.पी.एस. अँक्ट कलम 8 (क),20(ब)(11),29 तसेच भा. द. स. कलम 328 अन्वये त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयामध्ये अंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे हे करीत आहेत.

Web Title: State Excise Department's raid in Panvel seized a vehicle with 1 crore ganja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल