राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 03:01 PM2019-09-25T15:01:20+5:302019-09-25T15:02:53+5:30
राज्यात आज महायुतीचे सरकार आहे. उद्याही हेच सरकार सत्तेत असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबई: राज्यात आज महायुतीचे सरकार आहे. उद्याही हेच सरकार सत्तेत असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची 86वी जयंती व माथाडी कामगारांचा भव्य मेळावा एपीएमसी मार्केट(कांदा-बटाटा मार्केट) येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देऊन सरकारने स्व. अण्णासाहेब पाटील यांना आदरांजली व्हायली आहे. येत्या काळात माथाडी कामगारांचे सर्व प्रश्न सोडविले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
तर शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून युती होणारच, असे ठणकावून सांगितले. याप्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील, महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील, महापौर जयवंत सुतार, सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार संदीप नाईक व विविध मान्यवरांची उपस्थिती होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सानपाडा पामबीच येथील सेक्टर - 17मध्ये वडार समाज राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या पुढाकाराने उभारलेल्या राज्यातील पहिल्या वडार भवनाला सदिच्छा भेट दिली.