राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील पंचाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:18 AM2017-12-02T01:18:25+5:302017-12-02T01:18:47+5:30
पनवेल येथे १ ते ३ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय ज्युनियर व सब ज्युनियर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पहिल्याच दिवशी पंच म्हणून कामगिरी बजावण्यासाठी जळगाव येथून आलेल्या कैलाश राजपूत (६०) यांचा शुक्रवारी
पनवेल : पनवेल येथे १ ते ३ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय ज्युनियर व सब ज्युनियर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पहिल्याच दिवशी पंच म्हणून कामगिरी बजावण्यासाठी जळगाव येथून आलेल्या कैलाश राजपूत (६०) यांचा शुक्रवारी दुपारी २.३०च्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स अॅकॅडमीत आमदार बाळाराम पाटील व रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आॅलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ही राज्यातील ४० वी कुस्ती स्पर्धा पनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अशाप्रकारे दुर्दैवी घटना घडल्याने आयोजकांनी देखील या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
कैलास राजपूत यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना त्वरित पनवेल येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना त्याठिकाणी मृत घोषित करण्यात आले. राजपूत हे जळगावमधील चाळीसगावातून याठिकाणी या स्पर्धेसाठी पंच म्हणून कामगिरी बजावण्यासाठी आले होते.