नवी मुंबई: केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात एकता मॉल स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात नवी मुंबईतील उलवे येथे एकता मॉल उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा मॉल उभारण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली आहे. राष्ट्रीय एकात्मता, "मेक इन इंडिया", जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) संकल्पनेला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण कारागिरांना त्यांची उत्पादने विकण्यास हा मॉल उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकल्पासाठी अंमलबजावणी एजन्सी म्हणून सिडकोची निवडणूक करण्यात आली आहे. त्यानुसार सिडकोच्या नियोजन विभागाने उलवे नोडमध्ये एकता मॉलसाठी ५२०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड निश्चित केला आहे. देशभरातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संस्कृती देशभरातील ३६ जिल्ह्यांमध्ये मॉलच्या माध्यमातून प्रदर्शित करणार आहेत. अठरा महिन्यात या मॉलचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश सिडकोला दिले आहेत.
नवी मुंबईत उभारणार राज्यातील पहिला "एकता मॉल "
By कमलाकर कांबळे | Published: March 12, 2024 1:36 PM