कांद्याच्या दरामध्ये राज्यभर घसरण, मागणीपेक्षा आवक जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 06:16 AM2020-12-08T06:16:29+5:302020-12-08T06:17:40+5:30

onion Price News : राज्यात सर्वत्र कांद्याच्या दरामध्ये घसरण होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. नवीन कांद्याची आवकही वाढू लागली आहे.

Statewide fall in onion prices, incoming higher than demand | कांद्याच्या दरामध्ये राज्यभर घसरण, मागणीपेक्षा आवक जास्त

कांद्याच्या दरामध्ये राज्यभर घसरण, मागणीपेक्षा आवक जास्त

Next

नवी मुंबई : मुंबईसह राज्यात सर्वत्र कांद्याच्या दरामध्ये विक्रमी घसरण होऊ लागली आहे. सोमवारी मुंबई बाजारसमितीमध्ये तब्बल १,१७८ टन कांद्याची आवक झाली असून, होलसेल मार्केटमध्ये कांदा दर २० ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. 

राज्यात सर्वत्र कांद्याच्या दरामध्ये घसरण होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. नवीन कांद्याची आवकही वाढू लागली आहे. नोव्हेंबरमध्ये मुंबई बाजारसमितीमध्ये सरासरी ७०० ते ८०० टन आवक होत होती. सद्यस्थितीमध्ये आवक १ हजार टनापेक्षा जास्त होत आहे. सोमवारी तब्बल १,१८० टन आवक झाली आहे. 

एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये कांदा ४० ते ६० रुपये किलो दराने विकला जात होता. सद्यस्थितीमध्ये कांद्याची २० ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. किरकोळ मार्केटमध्येही कांदा ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. मुंबईमध्ये नाशिक, अहमदनगर परिसरात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.  आवक जास्त होत असल्यामुळे भाव घसरत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.सोमवारी तब्बल १,१८० टन आवक झाली आहे.  

मुंबई बाजारसमितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. आवक वाढल्यामुळे दर घसरत चालले आहेत.
- अशोक वाळुंज, संचालक, मुंबई बाजारसमिती

राज्यातील प्रमुख बाजारसमितीमधील  ६ डिसेंबरचे दर
बाजारसमिती    प्रतिकिलो दर
मुंबई                  २० ते ३०
कोल्हापूर           १२ ते ३४
सातारा      १० ते ३०
लासलगाव     १० ते ३६
चांदवड        ९ ते ३६
सांगली       १० ते २६
पुणे         ते २५ 

Web Title: Statewide fall in onion prices, incoming higher than demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.