नवी मुंबई : मुंबईसह राज्यात सर्वत्र कांद्याच्या दरामध्ये विक्रमी घसरण होऊ लागली आहे. सोमवारी मुंबई बाजारसमितीमध्ये तब्बल १,१७८ टन कांद्याची आवक झाली असून, होलसेल मार्केटमध्ये कांदा दर २० ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. राज्यात सर्वत्र कांद्याच्या दरामध्ये घसरण होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. नवीन कांद्याची आवकही वाढू लागली आहे. नोव्हेंबरमध्ये मुंबई बाजारसमितीमध्ये सरासरी ७०० ते ८०० टन आवक होत होती. सद्यस्थितीमध्ये आवक १ हजार टनापेक्षा जास्त होत आहे. सोमवारी तब्बल १,१८० टन आवक झाली आहे. एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये कांदा ४० ते ६० रुपये किलो दराने विकला जात होता. सद्यस्थितीमध्ये कांद्याची २० ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. किरकोळ मार्केटमध्येही कांदा ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. मुंबईमध्ये नाशिक, अहमदनगर परिसरात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. आवक जास्त होत असल्यामुळे भाव घसरत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.सोमवारी तब्बल १,१८० टन आवक झाली आहे.
मुंबई बाजारसमितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. आवक वाढल्यामुळे दर घसरत चालले आहेत.- अशोक वाळुंज, संचालक, मुंबई बाजारसमितीराज्यातील प्रमुख बाजारसमितीमधील ६ डिसेंबरचे दरबाजारसमिती प्रतिकिलो दरमुंबई २० ते ३०कोल्हापूर १२ ते ३४सातारा १० ते ३०लासलगाव १० ते ३६चांदवड ९ ते ३६सांगली १० ते २६पुणे ते २५