नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक रामचंद्र झा कार्यालयातच मद्यपान करत असल्याचे शुक्रवारी मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. चालकाच्या मुलाचे लग्न झाल्याची पार्टी साजरी करणाºया झा यांना नीट बोलताही येत नव्हते. मनसे कार्यकर्त्यांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला असून, संबंधितांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी निवेदन तयार केले आहे. हे निवेदन मनसेचे पदाधिकारी सर्व रेल्वे स्टेशनचे प्रबंधक व महापालिका आयुक्तांना देत आहेत. शुक्रवारी नवी मुंबईचे मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे कार्यकर्त्यांना घेऊन कोपरखैरणे रेल्वे स्टेशनमध्ये गेले होते. येथील स्टेशन प्रबंधक भगत हे सुट्टीवर होते. उपस्टेशन प्रबंधक रामचंद्र झा यांच्याकडे कार्यभार देण्यात आला होता, परंतु ते कार्यालयात उपस्थित नव्हते. येथील कर्मचाºयांना विचारणा केली असता, ते वॉर रूमच्या बाजूला असलेल्या रूममध्ये जेवण करत असल्याचे सांगण्यात आले.मनसेचे कार्यकर्ते तेथे गेले असता, झा व इतर कर्मचारी मद्यपान करत असल्याचे निदर्शनास आले. मनसे पदाधिकाºयांना पाहताच मद्याच्या बॉटल घेऊन इतर कर्मचाºयांनी तेथून पळ काढला. मनसेच्या पदाधिकाºयांनी झा यांना जाब विचारला. मद्यपान जास्त झाल्याने त्याला बोलताही येत नव्हते. अखेर वाहनचालकाच्या मुलाचे लग्न झाल्यामुळे पार्टी दिल्याचे त्याने सांगितले व माफी मागितली, परंतु हा प्रकार गंभीर असल्यामुळे मनसेच्या पदाधिकाºयांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. पोलिसांना बोलावून त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आणून दिला. पोलिसांनी दुसरे अधिकारी आल्यानंतर याविषयी पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मनसेला देण्यात आले.कोपरखैरणे रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक रामचंद्र झा कार्यालयातच मद्यपान करत असल्याचे निदर्शनास आले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी तेथील व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. झा याला बोलताही येत नव्हते. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. रेल्वेच्या अधिकाºयांनाही या विषयी कळविले आहे. या अधिकाºयावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.- संदीप गलुगडे,शहर सचिव, मनसे
स्टेशन उपप्रबंधकाची कार्यालयात मद्यपार्टी, कोपरखैरणे स्टेशनमधील प्रकार उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 3:54 AM