ज्वेल ऑफ नवी मुंबईत बुद्धांचा पुतळा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:24 AM2019-09-19T00:24:53+5:302019-09-19T00:24:59+5:30

ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे विश्वशांतीचे प्रतीक असलेल्या भगवान गौतम बुद्धांचा ३0 फूट उंचीचा आकर्षक पुतळा बसविण्यात येणार आहे.

A statue of Buddha will be erected in the Jewel of Navi Mumbai | ज्वेल ऑफ नवी मुंबईत बुद्धांचा पुतळा उभारणार

ज्वेल ऑफ नवी मुंबईत बुद्धांचा पुतळा उभारणार

Next

नवी मुंबई : शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे विश्वशांतीचे प्रतीक असलेल्या भगवान गौतम बुद्धांचा ३0 फूट उंचीचा आकर्षक पुतळा बसविण्यात येणार आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार बुधवारी त्यांनी महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या समवेत नियोजित जागेची पाहणी केली.

या पुतळ्यासाठी मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांची घोषणा केली आहे. पामबीच मार्गावर नेरुळ येथे महापालिकेच्या माध्यमातून ज्वेल आॅफ नवी मुंबई हे आकर्षक उद्यान विकसित करण्यात आले आहे. हे उद्यान पर्यटकांसाठी आकर्षणाचा भाग ठरले आहे. नवी मुंबईच नव्हे, तर आजूबाजूच्या शहरातील लोकांची सुद्धा येथे रीघ लागल्याचे पाहावयास मिळते. एकूणच नवी मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाºया ज्वेल आॅफ नवी मुंबई या स्थळाला अधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी गौतम बुद्धांचा भव्य पुतळा उभारण्याची संकल्पना मंदा म्हात्रे यांनी मांडली होती. त्यानुसार बुधवारी त्यांनी महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त मिसाळ यांच्यासह या स्थळाची पाहणी केली.

विविध प्रकल्पांमुळे नवी मुंबईला जागतिक शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे अन्य प्रांतातील विविध धर्मियांचा या शहराकडे ओढा वाढू लागला आहे. गौतम बुद्ध यांना शांततेचे प्रतीक म्हणून जगात ओळखले जाते. नवी मुंबईत त्यांचा कोठेही पुतळा नाही. ज्वेल आॅफ नवी मुंबईसारख्या प्रेक्षणीय स्थळी बुद्धांचा आकर्षक पुतळा उभारल्यास या ठिकाणाचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढणार आहे. बुद्धांचा तब्बल ३0 फूट उंचीचा ब्राँन्झचा भव्य पुतळा उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यापैकी २५ लाख रुपये आपण आपल्या आमदार निधीतून खर्च करणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी या वेळी स्पष्ट केले.
दरम्यान, नवी मुंबईच्या विकासासाठी महापालिकेची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे. त्यामुळे गौतम बुद्धांच्या पुतळा उभारण्याबाबत लवकरच सकारात्मक कार्यवाही सुरू केली जाईल, असे महापौर जयवंत सुतार यांनी या वेळी स्पष्ट केले. याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती नवीन गवते, सभागृह नेते रवींद्र इथापे, महापालिकेचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार,
उपायुक्त नितीन काळे आदी उपस्थित होते.

Web Title: A statue of Buddha will be erected in the Jewel of Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.