शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

ज्वेल ऑफ नवी मुंबईत बुद्धांचा पुतळा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:24 AM

ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे विश्वशांतीचे प्रतीक असलेल्या भगवान गौतम बुद्धांचा ३0 फूट उंचीचा आकर्षक पुतळा बसविण्यात येणार आहे.

नवी मुंबई : शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे विश्वशांतीचे प्रतीक असलेल्या भगवान गौतम बुद्धांचा ३0 फूट उंचीचा आकर्षक पुतळा बसविण्यात येणार आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार बुधवारी त्यांनी महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या समवेत नियोजित जागेची पाहणी केली.या पुतळ्यासाठी मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांची घोषणा केली आहे. पामबीच मार्गावर नेरुळ येथे महापालिकेच्या माध्यमातून ज्वेल आॅफ नवी मुंबई हे आकर्षक उद्यान विकसित करण्यात आले आहे. हे उद्यान पर्यटकांसाठी आकर्षणाचा भाग ठरले आहे. नवी मुंबईच नव्हे, तर आजूबाजूच्या शहरातील लोकांची सुद्धा येथे रीघ लागल्याचे पाहावयास मिळते. एकूणच नवी मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाºया ज्वेल आॅफ नवी मुंबई या स्थळाला अधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी गौतम बुद्धांचा भव्य पुतळा उभारण्याची संकल्पना मंदा म्हात्रे यांनी मांडली होती. त्यानुसार बुधवारी त्यांनी महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त मिसाळ यांच्यासह या स्थळाची पाहणी केली.विविध प्रकल्पांमुळे नवी मुंबईला जागतिक शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे अन्य प्रांतातील विविध धर्मियांचा या शहराकडे ओढा वाढू लागला आहे. गौतम बुद्ध यांना शांततेचे प्रतीक म्हणून जगात ओळखले जाते. नवी मुंबईत त्यांचा कोठेही पुतळा नाही. ज्वेल आॅफ नवी मुंबईसारख्या प्रेक्षणीय स्थळी बुद्धांचा आकर्षक पुतळा उभारल्यास या ठिकाणाचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढणार आहे. बुद्धांचा तब्बल ३0 फूट उंचीचा ब्राँन्झचा भव्य पुतळा उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यापैकी २५ लाख रुपये आपण आपल्या आमदार निधीतून खर्च करणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी या वेळी स्पष्ट केले.दरम्यान, नवी मुंबईच्या विकासासाठी महापालिकेची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे. त्यामुळे गौतम बुद्धांच्या पुतळा उभारण्याबाबत लवकरच सकारात्मक कार्यवाही सुरू केली जाईल, असे महापौर जयवंत सुतार यांनी या वेळी स्पष्ट केले. याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती नवीन गवते, सभागृह नेते रवींद्र इथापे, महापालिकेचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार,उपायुक्त नितीन काळे आदी उपस्थित होते.