पुतळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By admin | Published: August 19, 2015 11:58 PM2015-08-19T23:58:27+5:302015-08-19T23:58:27+5:30

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे पनवेलचे सुपुत्र. त्यांचे मूळ गाव पनवेल तालुक्यातीलच शिरढोण आहे. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या

The statue waiting for the inauguration | पुतळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

पुतळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

Next

वैभव गायकर, पनवेल
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे पनवेलचे सुपुत्र. त्यांचे मूळ गाव पनवेल तालुक्यातीलच शिरढोण आहे. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या या क्रांतिकारकाच्या नावाने पनवेल नगरपरिषदेने १८ ते १९ कोटी रुपये खर्च करून नाट्यगृह उभारले आहे. या नाट्यगृहात आद्य क्रांतिकारकांचा अर्धाकृती पुतळा उभारला असून नगरपरिषदेला त्या पुतळ्याच्या अनावरणाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.
पंधरा दिवसांपूर्वी नगरपरिषदेने नाट्यगृहात हा अर्धाकृती पुतळा बसवला आहे. नाट्यगृहात प्रवेश करताच समोरच आद्य क्रांतिकारकांचा लाल कापडाने बांधून ठेवलेला पुतळा नजरेस पडतो. अनेक प्रेक्षकांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. पुतळ्याला अशाप्रकारे झाकायचेच होते तर तो पुतळा बसविण्याची घाई केलीच का? हा पुतळा बसविण्यासाठी नगरपरिषदेने टेंडर काढले होते. या पुतळ्याची किं मत ३ लाख २५ हजार एवढी आहे. कास्टिंगच्या बनावटीचा हा पुतळा आहे. यापूर्वी नगरपरिषदेने संगमरवरापासून बनवलेला पुतळा याठिकाणी बसवला होता. तो टिकाऊ व आकर्षक नसल्यामुळे त्याच्या जागी कास्टिंगचा पुतळा बसविण्यात आला. मात्र पुतळ्याच्या अनावरणाची तारीख निश्चित नसल्यामुळे आद्य क्रांतिकारकांचा पुतळा त्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र सध्या याठिकाणी पाहावयास मिळत आहे. पुतळ्याच्या अनावरणासाठी यापूर्वी ९ आॅगस्ट व त्यानंतर १५ आॅगस्ट या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे व रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांना नगरपरिषदेच्या वतीने निमंत्रण देण्यात आले होते. मात्र मंत्रीमहोदयांना वेळ मिळत नसल्यामुळे हे उद्घाटन पुढे ढकलले गेले असल्याचे बोलले जात आहे.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य मोठे आहे. भारताच्या इतिहासात त्यांच्या कार्याचा ठसा ठळकपणे उमटला आहे. नुकतेच त्यांच्या मूळ गावी शिरढोण येथे त्यांच्या वाड्याचे नूतनीकरण करण्यात आले. त्यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्यात आले. याठिकाणी आद्य क्रांतिकारकांचे भव्य स्मारक देखील लवकरच उभारले जाणार आहे.

Web Title: The statue waiting for the inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.