शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

पुतळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By admin | Published: August 19, 2015 11:58 PM

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे पनवेलचे सुपुत्र. त्यांचे मूळ गाव पनवेल तालुक्यातीलच शिरढोण आहे. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या

वैभव गायकर, पनवेलआद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे पनवेलचे सुपुत्र. त्यांचे मूळ गाव पनवेल तालुक्यातीलच शिरढोण आहे. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या या क्रांतिकारकाच्या नावाने पनवेल नगरपरिषदेने १८ ते १९ कोटी रुपये खर्च करून नाट्यगृह उभारले आहे. या नाट्यगृहात आद्य क्रांतिकारकांचा अर्धाकृती पुतळा उभारला असून नगरपरिषदेला त्या पुतळ्याच्या अनावरणाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.पंधरा दिवसांपूर्वी नगरपरिषदेने नाट्यगृहात हा अर्धाकृती पुतळा बसवला आहे. नाट्यगृहात प्रवेश करताच समोरच आद्य क्रांतिकारकांचा लाल कापडाने बांधून ठेवलेला पुतळा नजरेस पडतो. अनेक प्रेक्षकांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. पुतळ्याला अशाप्रकारे झाकायचेच होते तर तो पुतळा बसविण्याची घाई केलीच का? हा पुतळा बसविण्यासाठी नगरपरिषदेने टेंडर काढले होते. या पुतळ्याची किं मत ३ लाख २५ हजार एवढी आहे. कास्टिंगच्या बनावटीचा हा पुतळा आहे. यापूर्वी नगरपरिषदेने संगमरवरापासून बनवलेला पुतळा याठिकाणी बसवला होता. तो टिकाऊ व आकर्षक नसल्यामुळे त्याच्या जागी कास्टिंगचा पुतळा बसविण्यात आला. मात्र पुतळ्याच्या अनावरणाची तारीख निश्चित नसल्यामुळे आद्य क्रांतिकारकांचा पुतळा त्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र सध्या याठिकाणी पाहावयास मिळत आहे. पुतळ्याच्या अनावरणासाठी यापूर्वी ९ आॅगस्ट व त्यानंतर १५ आॅगस्ट या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे व रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांना नगरपरिषदेच्या वतीने निमंत्रण देण्यात आले होते. मात्र मंत्रीमहोदयांना वेळ मिळत नसल्यामुळे हे उद्घाटन पुढे ढकलले गेले असल्याचे बोलले जात आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य मोठे आहे. भारताच्या इतिहासात त्यांच्या कार्याचा ठसा ठळकपणे उमटला आहे. नुकतेच त्यांच्या मूळ गावी शिरढोण येथे त्यांच्या वाड्याचे नूतनीकरण करण्यात आले. त्यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्यात आले. याठिकाणी आद्य क्रांतिकारकांचे भव्य स्मारक देखील लवकरच उभारले जाणार आहे.