मानकु लेत शेतीला उधाणाचा फटका
By admin | Published: November 17, 2016 06:01 AM2016-11-17T06:01:05+5:302016-11-17T06:01:05+5:30
समुद्राच्या उधाणाचा फटका अलिबाग तालुक्यातील मानकुले येथील शेतीला बसला आहे.
अलिबाग : समुद्राच्या उधाणाचा फटका अलिबाग तालुक्यातील मानकुले येथील शेतीला बसला आहे. समुद्राचे खारेपाणी शेतामध्ये घुसून तेथील शेतक ऱ्यांचे नुकसान झाले आहे. तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी खारभूमी सर्वेक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मानकुले परिसरात सातत्याने समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसतच असते. खारे पाणी शेतामध्ये घुसून आतापर्यंत हजारो हेक्टर शेतीचे क्षेत्र नष्ट झाले आहे. शेतीमध्ये खारे पाणी घुसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात खारफुटी वनस्पतींचे जंगल निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन तर घेता येतच नाही, शिवाय तेथील शेतकरी शेतीही विकू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहेत. सरकारने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण आले होते. तेथे असणारी खारबंदिस्ती तुटली. उधाणामुळे समुद्राचे खारे पाणी शेतामध्ये घुसले. यामुळे शेतक ऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
खारभूमी विभागाकडून २००६-०७ पासून या विभागात खारबंदिस्तीचे काम झालेले नाही; परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये या ठिकाणी २०१३-१४ आणि २०१६-१७ या कालावधीमध्ये सुमारे पाच लाख ९३ हजार ६०६ रु पये खर्च करण्यात आले आहेत. एकही रु पया खर्च झालेला नसताना लाखोंची कामे कुठे झाली या कामांची चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर चंद्रकांत पाटील, गजाजन पाटील, नवनाथ पाटील, महादेव पाटील, बलदेव पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. शेतीच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. नुकसानभरपाई सरकारच्या तिजोरीतून नको, तर खारभूमीचे कनिष्ठ अभियंता यांच्या पगारातून द्यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खारभूमीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
कामाच्या चौकशीची मागणी : खारभूमी विभागाकडून २००६-०७ पासून या विभागात खारबंदिस्तीचे काम झालेले नाही; परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये या ठिकाणी २०१३-१४ आणि २०१६-१७ या कालावधीमध्ये सुमारे पाच लाख ९३ हजार ६०६ रु पये खर्च करण्यात आले आहेत. एकही रु पया खर्च झालेला नसताना लाखो रु पयांची कामे कुठे झाली या कामांची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर चंद्रकांत पाटील, गजाजन पाटील, नवनाथ पाटील, महादेव पाटील, बलदेव पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.