तिजोरीत खडखडाट; नगरसेवक हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2015 12:13 AM2015-08-22T00:13:26+5:302015-08-22T00:13:26+5:30

महापालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याचा परिणाम विकासकामांवर होऊ लागला आहे. स्थायी समितीपाठोपाठ महासभेतही नवीन प्रस्ताव येणे बंद झाले आहे

Steeple; Corporator Hatabal | तिजोरीत खडखडाट; नगरसेवक हतबल

तिजोरीत खडखडाट; नगरसेवक हतबल

Next

नामदेव मोरे, नवी मुंबई
महापालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याचा परिणाम विकासकामांवर होऊ लागला आहे. स्थायी समितीपाठोपाठ महासभेतही नवीन प्रस्ताव येणे बंद झाले आहे. विनंती करूनही कामेच होत नसल्यामुळे नगरसेवक हतबल झाले आहेत. असंतोष वाढू लागला असून, त्याचे पडसाद विशेष महासभेत उमटण्याची शक्यता आहे.
सरकारच्या एलबीटी बंद करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका नवी मुंबई महापालिकेस बसला आहे. पालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाला असून, त्याचा परिणाम विकासकामांवर झाला आहे. यापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत किमान १० ते १५ विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी येत होते. परंतु आता प्रस्तावच नसल्यामुळे अनेक वेळा बैठकच घेतली जात नाही. आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासकीय मंजुरीसाठी एकही प्रस्ताव आला नव्हता. विकासकामांचे प्रस्ताव नसलेली ही एकमेव सभा असल्याचे बोलले जात आहे. पालिकेकडे पैसेच नसल्यामुळे नवीन कामे मंजूर केली जात नाहीत. पालिकेसाठी हे वर्ष कसोटीचे असणार आहे. या काळात सुरू असलेली कामे मार्गी लावणे व अत्यावश्यक असतील तेवढीच कामे करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. विकासकामे होत नसल्यामुळे अनेक नगरसेवक नाराजी व्यक्त करू लागले आहेत. २४ आॅगस्टला होणाऱ्या विशेष महासभेमध्ये याचे पडसाद उमटणार असून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना व प्रशासनाला धारेवर धरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आकडेवारीसह तपशील संकलित केला आहे. प्रशासनानेही आर्थिक स्थितीचे विवरण तयार केले असून त्याचे सादरीकरण कसे करायचे याची तयारी सुरू आहे. शहरात अनावश्यक गोष्टींवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसविण्यात आलेला नाही. एकही महत्त्वाचा प्रकल्प वेळेत पूर्ण झालेला नाही. कामे वेळेत न झाल्यामुळे त्यांचे खर्च वाढले आहेत. आर्थिक स्थितीला नियोजनामधील त्रुटीच जबाबदार असल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. विशेष सर्वसाधारण सभेमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

२०१५-१६ साठी अपेक्षित उत्पन्न (कोटी)
प्रकार                       अपेक्षित
एलबीटी                      ८७०.२
मालमत्ता कर              ५९५
नगररचना                  १००
जाहिरात व अतिक्रमण   ६.५४
पाणी कर                   ११२.१०
रस्ता दुरुस्ती फी             ११.५०
सोलर प्रकल्प                      २०
रुग्णालयांचे उत्पन्न         ५.७८
मलनिस्सारण कर          १.६५
मोरबे धरण                     १०
शासन अनुदान               ३५
विष्णुदास भावे              ०.७५
कर्ज                           २५.४
इतर उत्पन्न             ४६.३९
एकूण                 १८३९.७४



२०१५-१६ साठी अपेक्षित खर्च (कोटी)
प्रकार                       खर्च
प्रशासकीय खर्च         २२५.९
अभियांत्रिकी कामे         ५२१
पाणी व मोरबे धरण        १६०
मलनिस्सारण केंद्र         ६७.३६
एनएमएमटी अनुदान         ७०
उद्यान                       ३४.५७
पथदिवे                        १३३.६७
अग्निशमन व आपत्कालीन५०.४४
घनकचरा व्यवस्थापन      १०५.१०
योजना विभाग                    २३.७५
सार्वजनिक अभियांत्रिकी११८.३७
शिक्षण                            १२०.५०
इतर खर्च                         १३१.७१
एमएमआरडीए प्रकल्प           ५९.८९
शासन कर परतफेड             ६८
कर्ज परफेड                        ६६.२७

Web Title: Steeple; Corporator Hatabal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.