शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आता भटक्या मांजरींची नसबंदी; नगरविकास विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 7:33 AM

राज्य मानवी हक्क आयोगाचे होते आदेश

- नारायण जाधवनवी मुंबई : शहरांतील भटक्या श्वानांचा उपद्रव कमी करण्यासाठी नगरविकास विभागाने त्यांची नसबंदी करण्याचे धोरण स्वीकारले  आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक शहरांत भटक्या श्वानांची नसबंदी करण्यात येते. त्याच धर्तीवर आता राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींनी आपल्या क्षेत्रात वावरणाऱ्या भटक्या मांजरींची नसबंदी करावी, असे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. नसबंदी केल्यास भटक्या मांजरींच्या संख्येवर नियंत्रण येऊन त्यांचा उपद्रव कमी होईल, असा विश्वास नगरविकास विभागाने याबाबतच्या आदेशात व्यक्त केला आहे.

राज्यातील विविध शहरांमध्ये भटक्या मांजरींचा उपद्रव अलीकडे वाढला आहे. त्यातच काही प्राणिमित्र संघटना, कार्यकर्ते अशा भटक्या श्वानांना खाऊ घालतात, त्यांच्यावर उपचार करतात. यातून भटक्या कुत्र्यांप्रमाणे मांजरींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने भटक्या मांजरींचा उपद्रव कमी करण्यासंदर्भात २०२२ मध्ये सुमोटो याचिका दाखल केली होती. त्यावर २ फेब्रुवारी २०२३ रोजी सुनावणी झाली. त्यावेळी भटक्या श्वानांना ज्याप्रमाणे नसबंदी करून पुन्हा शहरात सोडले जाते, त्याच धर्तीवर भटक्या मांजरींचीही नसबंदी करून त्यांना सोडावे, असे निर्देश आयोगाने दिले होते.

नगरविकास  विभागाने हा २३ मार्च २०२३ रोजी निर्णय घेतला. भटक्या मांजरींवर नसबंदीची प्रक्रिया पूर्ण कायदेशीवर बाबी पूर्ण करून करावी, भटक्या श्वानांवर भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाच्या मान्यतेने आणि प्राणी जन्मदर नियंत्रण समिती स्थापन करावयाची आहे. या दोघांनी मान्यता दिलेल्या सामाजिक संस्थेस भटक्या  मांजरींवर नसबंदी करण्याचे काम द्यावयाचे आहे.

असा मिळेल खर्चमांजरींवर नसबंदी करणार्या संस्थेस प्रतिमांजर २००० रुपये मिळणार आहेत. यात ४०० रुपये तिला पकडून आणणे, शस्त्रक्रियेनंतर सोडण्याकरिता द्यावेत, तसेच प्री-ऑपरेटिव्ह केअर, फिडिंग, सर्जरी, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर यासह औषधांसाठी प्रतिमांजर १६०० रुपये द्यावेत. मात्र, हे दर ढोबळ असून, शहरनिहाय ते नियंत्रण समित्यांनी ठरविलेल्या दरानुसार  कमी-जास्त असू शकतात, असेही नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

हे नियम पाळावेत

  • नसबंदी करणाऱ्या संस्थेकडे तज्ज्ञ प्राण्यांचे डॉक्टर, कर्मचारी असावेत, भूलतज्ज्ञ असावेत, शस्त्रक्रियेसाठी पुरेशी जागा असावी
  • मांजरी पकडून नसबंदी शस्त्रक्रियेनंतर पुन्हा शहरात सोडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी असावेत
  • संस्थेला प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम आयोजित करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असावा
  • कोणत्याही मांजरीचे वय सहा महिने पूर्ण  होण्याआधी किंवा परिपक्वता पूर्ण होण्यासाठी नसबंदी करू नये
  • गरोदर मांजरींचा गर्भपात करू नये, नसबंदी करून झाल्यावर तशी नोंद ठेवावी, ती केलेल्या मांजरींची ओळख पटण्यासाठी तिला टॅगिंग करावे.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNavi Mumbaiनवी मुंबई