शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

पेण रेल्वेस्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवा

By admin | Published: June 21, 2017 5:44 AM

एप्रिल २०१५पासून पेण-पनवेल-पेण, तर एप्रिल २०१७पासून पनवेल-रोहा-पनवेल, अशा रेल्वे गाड्या सुरू होणार होत्या. ३१ मार्च २०१५ रोजी पेण-पनवेल-पेण हा दुहेरी मार्ग तयार आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : एप्रिल २०१५पासून पेण-पनवेल-पेण, तर एप्रिल २०१७पासून पनवेल-रोहा-पनवेल, अशा रेल्वे गाड्या सुरू होणार होत्या. ३१ मार्च २०१५ रोजी पेण-पनवेल-पेण हा दुहेरी मार्ग तयार आहे, असा फलक पेण रेल्वे प्रशासनाने अधिकृतरीत्या गेल्या वर्षीच लावला आहे. असे असताना रेल्वे प्रशासन नेमकी कसली वाट पाहत आहे, असा प्रश्न करत पेण-पनवेल-पेण या मार्गावरून नव्या प्रवासी गाड्या सुरू करण्याची मागणी निसर्ग फ्रेंडशिप असोसिएशन कोकण आणि मित्र स्वयंसेवी संस्थेने पेण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.सध्या पेण रेल्वेस्थानकात दादर-रत्नागिरी, दिवा-मडगाव, दिवा-रोहा या प्रवासी गाड्यांनाच थांबा आहे. मात्र, लांब पल्ल्याच्या गाड्या या ठिकाणी थांबत नाहीत. पेण-पनवेल दुपदरीकरणाचा मार्ग पूर्ण होऊनही पेण येथून नव्या गाड्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे पेणवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. पेण हे ठिकाण मुंबईला अंत्यत जवळ आणि रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी खरेदी-विक्र ीसाठी, पर्यटनासाठी देशातूनच नाही, तर जगभरातून लोक जा-ये करत असतात. याच पेण परिसरात गणपतीचे हजारो कारखाने आहेत, त्यामुळे पेणला गणपती मूर्तीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. गणेश मूर्तींसह पेणमध्ये विविध प्रकारची ताजी भाजी, ओली व सुकी मासळी, पापड, पोहे अशा व इतर अनेक वस्तू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि किफायतशीर भावात उपलब्ध असतात. पेण-खोपोली रस्त्यावर मोठी औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे दळणवळणासाठी रेल्वेसारखे साधन या ठिकाणी खूप महत्त्वाचे ठरते. पेणवरून सुरू होणाऱ्या प्रवासी रेल्वेचा फायदा रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, मुरु ड, रोहा, पनवेल, उरण, खालापूर, पाली, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन महाड, पोलादपूर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमधील जनतेला होणार आहे. पेणवरून नव्या गाड्या सुरू करण्यासंदर्भात सह्यांची मोहीम हाती घेण्यात येत असल्याची माहिती निसर्ग फ्रेंडशिप असोसिएशन कोकणचे अध्यक्ष योगेश शशिकांत म्हात्रे यांनी दिली.