सर्व्हिस रोडच्या मागणीसाठी सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 11:13 PM2019-05-27T23:13:37+5:302019-05-27T23:13:45+5:30

सायन - पनवेल महामार्गावर वाशी गावाजवळील तीनही भुयारी मार्गाला लागून सर्व्हिस रोडचे बांधकाम करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी रास्ता रोको केला.

Stop the road on the Sion-Panvel highway for the demand of the service road | सर्व्हिस रोडच्या मागणीसाठी सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको

सर्व्हिस रोडच्या मागणीसाठी सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको

Next

नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर वाशी गावाजवळील तीनही भुयारी मार्गाला लागून सर्व्हिस रोडचे बांधकाम करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी रास्ता रोको केला. पत्रव्यवहार करूनही प्रशासन दाद देत नसल्यामुळे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तत्काळ कार्यवाही झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महामार्गावर वाशी येथील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. याठिकाणी वाशी गाव व सिडको नोडला जोडण्यासाठी तीन भुयारी मार्ग तयार केले आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करताना भुयारी मार्गांना जोडणारा सर्व्हिस रोड तयार करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली होती. नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेच्या माध्यमातून व स्थानिक नगरसेवकांनी यासाठी पाठपुरावा केला होता, परंतु प्रशासन दाद देत नसल्यामुळे सोमवारी रास्ता रोको करण्यात आला. यामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास दहा मिनिटे ठप्प झाली होती. मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.
ग्रामस्थ आक्रमक झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मागण्यांची निवेदन स्वीकारले व सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्या अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली. आश्वासनांची पूर्तता केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
काँगे्रसचे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, युवक काँगे्रसचे अध्यक्ष निशांत भगत, नगरसेविका वैजयंती भगत, रूपाली भगत, संजयराव यादव, रामेश्वर दयाल शर्मा, चंद्रकला नायडू, शैलेश घाग, सचिन शिंदे, विष्णू मेढकर, बंटी सिंग, सूरज देसाई व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
>आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
एनएमएसए येथून भुयारी मार्गाने महामार्गावर मुुंबईला जाणाºया दिशेने वेगवान वाहने जात असल्यामुळे अपघात होतात. यामुळे येथे सर्व्हिस रोड बनविण्यात यावा.
नवी मुंबई स्पोर्ट क्लब येथील मुंबई व पुण्याकडे जाण्या - येण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर करताना एमजीएम रुग्णालय, फोर्टीजकडे तत्काळ जाता यावे यासाठी सर्व्हिस रोड बनविण्यात यावा.
वाशी गाव जुना बस स्टॅँडला जुन्या भुयारी मार्गाजवळ बनविलेल्या नवीन बस स्टॉप येथे स्थलांतर करावे. भुयारी मार्गाची दुरुस्ती व सुशोभीकरण करावे.
वाशी गावच्या जुन्या भुयारी मार्गात गळती सुरू असून पाणी साचत असते. येथे पाणी उपसण्यासाठी सक्षम पंप हाऊस बनविण्यात यावे.
सतत होणारे अपघात थांबविण्यासाठी स्थानिक मच्छीमारांकरिता
जुने खाडी पूल ते वाशी
गाव असा पदपथ करण्यात यावा.
खारघर टोल नाक्याप्रमाणे वाशी टोल नाक्याच्या पुढे असलेल्या मोकळ्या जागी टोल
नाका स्थलांतरित
करावा जेणेकरून वाशी गावात व महामार्गावर वाहतूककोंडी होणार
नाही.
>वाशी गावाजवळ सर्व्हिस रोड बनविण्यात यावा व इतर प्रश्न मार्गी लावण्यात यावे यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने मागण्या मान्य करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. काम सुरू केले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-दशरथ भगत, माजी जिल्हा अध्यक्ष काँगे्रस

Web Title: Stop the road on the Sion-Panvel highway for the demand of the service road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.