नवी मुंबई : आरोग्य विभागात विविध रुग्णालायत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी मंगळवारी काम बंद आंदोलन केले. या आंदोलनात विविध विभागातील सुमारे ४०० कर्मचारी सहभागी झाले होते. वेतन वेळेवर मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले होते. शिवाय, मागील १३ महिन्यांची थकबाकीची रक्कमसुद्धा अद्यापि मिळाली नाही. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.महापालिकेच्या ऐरोली, वाशी, नेरुळ रुग्णालयासह बेलापूर येथील माता-बाल रुग्णालयात काम करणाºया सुमारे ४०० कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला होता. या मागण्यांसंदर्भात महापालिका प्रशासनाला संघटनेकडून ३१ आॅगस्ट रोजी पत्र देण्यात आले होते.
कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 2:35 AM