स्ट्रॉबेरीची आवक वाढली, दिवसाला १५०० क्रेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:28 AM2017-12-30T02:28:39+5:302017-12-30T02:28:44+5:30
नवी मुंबई : नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान बाजारात स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला १५०० क्रेट स्ट्रॉबेरीची आवक होते.
प्राची सोनवणे
नवी मुंबई : नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान बाजारात स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला १५०० क्रेट स्ट्रॉबेरीची आवक होते. वाई, पाचगणी, महाबळेश्वर, सातारा परिसरातील स्ट्रॉबेरीला गेल्या काही दिवसांपासून मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. यामध्ये विंटर, चार्लीसारख्या प्रकाराला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.
वाई, महाबळेश्वर येथून आलेल्या स्ट्रॉबेरीच्या चांगल्या प्रतीच्या दोन किलोंच्या बॉक्ससाठी २०० ते २६० रुपये, तर दुय्यम प्रतीच्या स्ट्रॉबेरीसाठी १५० ते १८० रु पये मोजावे लागत आहेत. थंडीचा हंगामा सुरू झाल्यापासून बाजारात स्ट्रॉबेरीची आवक सुरू झाली आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे पिके पाण्याखाली आल्याने, गेल्या दोन आठवड्यांपासून थंडी वाढू लागली आहे. थंडीत स्ट्रॉबेरीला रंगही चांगला येतो आणि गोडी अधिक असल्याने ग्राहकांसह व्यापाºयांकडून स्ट्रॉबेरीला अधिक मागणी असते. महाबळेश्वरबरोबर वाई, पाचगणी, भिलारवाडी, सरकलवाडी आदी ठिकाणांहून स्ट्रॉबेरीची बाजारात आवक होत आहे. एपीएमसी घाऊक बाजारपेठेत ६००० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल दराने स्ट्रॉबेरी उपलब्ध आहेत. चांगल्या प्रतीच्या स्ट्रॉबेरीचे दर हे दुय्यम प्रतीच्या स्टॉबेरीपेक्षा ४० ते ६० रुपयांनी जास्त आहेत. नवी मुंबई परिसरातील आठवडे बाजारांमध्ये स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून महाबळेश्वर, जावली परिसरांतील शेतकरी या ठिकाणी विक्रीसाठी येत आहेत. स्ट्रॉबेरी नाशवंत असल्याने लवकरात लवकरात बाजारात पोहोचविली तरच शेतकºयांना, व्यापाºयांना त्याचा फायदा होतो. मार्र्चपर्यंत स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू राहणार असून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्ट्रॉबेरीचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने मागणी असातानाही त्यानुसार उत्पादन न झाल्याने गेल्या महिन्यात मात्र आवक मोठ्या प्रमाणात घटली होती.
>उत्पादनात ५० टक्के घट
अवकाळी पावसाचा फटका स्ट्रॉबेरीला बसला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात घट झाली. गेल्या आठवडाभरापासून वाशीतील एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली आहे. येत्या काही दिवसांत मागणी आणखी वाढणार असून दरांमध्ये घट होणार नाही. फेब्रुवारीमध्ये स्ट्रॉबेरीची आवक आणखी वाढेल. या रोपाला थंडीची आवश्यकता, तसे हवामान असल्याने आवकही वाढली आहे.
- संजय पिंपळे, सचिव, फ्रुट आणि व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनच, एपीएमसी