अमेटी विद्यापीठावर धडक मोर्चा
By admin | Published: November 9, 2016 04:04 AM2016-11-09T04:04:32+5:302016-11-09T04:04:32+5:30
अमेटी विद्यापीठाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक सुरू ठेवल्याने प्रकल्पग्रस्तांच्या श्री सद्गुरू कृपा शेतकरी संस्थेने भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार
पनवेल : अमेटी विद्यापीठाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक सुरू ठेवल्याने प्रकल्पग्रस्तांच्या श्री सद्गुरू कृपा शेतकरी संस्थेने भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला असून प्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक हक्कासाठी प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी भाताण येथील अमेटी विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आला.
अमेटी संस्थेने जमीन खरेदी करताना, स्थानिक शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे आश्वासित केले होते. २०१५ मध्ये प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या आंदोलनात अमेटी विद्यापीठ भाताणचे कुलगुरू डॉ. विजय खोले व व्यवस्थापनाने ३६ शेतकऱ्यांना जून २०१६ च्या अखेरपर्यंत कामावर घेण्याचे लेखी पत्र दिले होते. याशिवाय अमेटीमध्ये चालणाऱ्या कंत्राटापैकी ५० टक्के कंत्राटी कामे शेतकरी संस्थेला देण्यात येतील, असेही सांगण्यात आले होते. मात्र गेल्या ६ महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचे कंत्राट देण्यात आले नाही व तसेच शेतकऱ्यांनाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात आले नाही. यासंदर्भात वेळोवेळी अमेटी व्यवस्थापनाला सूचित करण्यात आले.
शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सामंजस्याने प्रयत्न करण्यात आले, मात्र अमेटी विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद प्रकल्पग्रस्तांना देण्यात आला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी आंदोलन केले. (वार्ताहर)