पहिल्या राष्ट्रीय बीच गेम्स स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
By नारायण जाधव | Published: January 10, 2024 01:35 PM2024-01-10T13:35:33+5:302024-01-10T13:35:57+5:30
महाराष्ट्राचे टॉप थ्री मधील अव्वल स्थान अबाधित ठेवले आहे.
नवी मुंबई : ४ ते ११ जानेवारी दरम्यान दिव येथे पार पडत असलेल्या बीच गेम्स क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करताना एकूण ३ सुवर्ण २ रजत ४ कांस्य अशी ९ पदके जिंकून पिंच्याक सिलॅट खेळात महाराष्ट्राचे टॉप थ्री मधील अव्वल स्थान अबाधित ठेवले आहे.
दिव बिच गेम्स २०२४ मध्ये मल्लखांब, टग ऑफ वॉर, बीच बॉक्सिंग, बीच व्हॉलीबॉल, बीच सॉकर, सी स्विमिंग, बीच कबड्डी आणि पिंच्याक सिलॅट असे एकूण ८ खेळ समाविष्ट करण्यात आले असून त्यात एकूण १२०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहेत. त्यातील पिंच्याक सिलॅट खेळामध्ये भारतातील विविध राज्यातून निवडण्यात आलेल्या २२० खेळाडूंमध्ये महाराष्ट्र संघात १७ खेळाडू होते.
महाराष्ट्राच्या या खेळाडूंची दमदार कामगिरी पुढीलप्रमाणेः
फाईट इव्हेंट सुवर्णपदक - १. ओमकार नवनाथ सानप (६०-६५) किलो २. पियुष अभय शुक्ला (८५-१००) किलो ३. भक्ती शिवाजी किल्लेदार (७५-९५) किलो
*टँडींग फाईट इव्हेंट व सोलो क्रिएटीव्हीटी*ः
दोन रजत पदके
१. किर्णाक्षी किशोर येवले (६०-६५) किलो
फाईट इव्हेंट कांस्य पदक १. शुभम गणेश किंगरे (-४५)२. समीक्षा सतीश सावंत (४५-५०)३. दिक्षा शंकर शिंदे (७०-७५) किलो ४. स्नेहल सचिन डांगे (६५-७०)
या स्पर्धेचा उदघाट्न समारंभ ४ जानेवारी रोजी केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर, दिल्ली लेपटनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना, लडाखचे लेपटनंट गव्हर्नर बी. डी. शर्मा, दिव दमण दादरा नगरहवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, दिव दमणचे खासदार लालभाई पटेल यांच्या हस्ते पार पडला.
बक्षीस समारंभ ७ जानेवारी रोजी दिवच्या जिल्हाधिकारी सौ.भानुप्रभा मॅडम, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर प्रकाश येवले, सेंटर फॉर एक्सलन्स दिवचे संचालक निखील देसाई , दिवच्या महापौर सौ.हेमलत्ता बेन, दमन व दिव चे डायरेक्टर ऑफ स्पोर्टस अरुण गुप्ता, मोहम्मद इकबाल (C E O IPSF), दमन दिवचे क्रीडा अधिकारी अक्षय कोटलवार, IPSF चे जनरल सेक्रेटरी तारिक अहमद झरगर, IPSF च्या उपाध्यक्षा फिलिया थॉमस, दिव दमन पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे सेक्रेटरी एलेक्स थॉमस ह्या पदाधिकाऱ्याच्या शुभ हस्ते झाला. या स्पर्धेत प्रशिक्षकाची जबाबदारी ओमकार अभंग, अंशुल कांबळे, पूर्वी गांजवे व टीम मॅनेजर अमोल कदम, तृप्ती बनसोडे सुरेखा येवले यांनी पार पाडली.