अत्याचारी पित्याला अटक
By Admin | Published: April 30, 2017 03:58 AM2017-04-30T03:58:11+5:302017-04-30T03:58:11+5:30
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. तीन वर्षांपासून पित्याकडून होत असलेल्या अत्याचाराला
नवी मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. तीन वर्षांपासून पित्याकडून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून मित्राच्या मदतीने तिने घर सोडले होते; परंतु मित्रानेही तिचा गैरफायदा घेतल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
कोपरखैरणे सेक्टर १४ येथे राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. तीन वर्षांपासून ती पित्याकडूनच होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला बळी पडली होती. यासंबंधीची तिने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर क्रिस्टोफर फ्रान्सीस याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. क्रिस्टोफरला तीन मुली व एक मुलगा असून त्याचे दुसरे लग्न आहे. ती दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर घरात कोणी नसल्याची संधी साधून तो तिच्यावर बलात्कार करायचा. तीन वर्षांपासून होत असलेल्या अत्याचाराची माहिती तिने मित्र आदित्य देठे उर्फ पॉली डिसुझा याला दिली. त्यानेही भावनिक आधार देण्याच्या बहाण्याने शरीरसंबंध केले. अखेर त्याच्यासोबत ती घरातून निघून गेली होती. तक्रारीनंतर तिचा शोध लागल्यानंतर चौकशीदरम्यान तिने संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. यानुसार वडील क्रिस्टोफर फ्रान्सीस व मित्र आदित्य देठे याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)