शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

अत्याचारी पित्याला अटक

By admin | Published: April 30, 2017 3:58 AM

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. तीन वर्षांपासून पित्याकडून होत असलेल्या अत्याचाराला

नवी मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. तीन वर्षांपासून पित्याकडून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून मित्राच्या मदतीने तिने घर सोडले होते; परंतु मित्रानेही तिचा गैरफायदा घेतल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.कोपरखैरणे सेक्टर १४ येथे राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. तीन वर्षांपासून ती पित्याकडूनच होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला बळी पडली होती. यासंबंधीची तिने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर क्रिस्टोफर फ्रान्सीस याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. क्रिस्टोफरला तीन मुली व एक मुलगा असून त्याचे दुसरे लग्न आहे. ती दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर घरात कोणी नसल्याची संधी साधून तो तिच्यावर बलात्कार करायचा. तीन वर्षांपासून होत असलेल्या अत्याचाराची माहिती तिने मित्र आदित्य देठे उर्फ पॉली डिसुझा याला दिली. त्यानेही भावनिक आधार देण्याच्या बहाण्याने शरीरसंबंध केले. अखेर त्याच्यासोबत ती घरातून निघून गेली होती. तक्रारीनंतर तिचा शोध लागल्यानंतर चौकशीदरम्यान तिने संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. यानुसार वडील क्रिस्टोफर फ्रान्सीस व मित्र आदित्य देठे याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)