विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, दिल्लीतल्या घटनेचे पडसाद, रायन इंटरनॅशनल शाळेवर पालक धडकणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 06:32 AM2017-09-12T06:32:44+5:302017-09-12T06:33:23+5:30

दिल्ली येथील रायन इंटरनॅशनल शाळेत घडलेल्या प्रकारानंतर शहरातील खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे शहरातील रायन इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

Students' security questionnaire on the anvil, Delhi fall victim to rape, Ryan International School | विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, दिल्लीतल्या घटनेचे पडसाद, रायन इंटरनॅशनल शाळेवर पालक धडकणार  

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, दिल्लीतल्या घटनेचे पडसाद, रायन इंटरनॅशनल शाळेवर पालक धडकणार  

Next

नवी मुंबई : दिल्ली येथील रायन इंटरनॅशनल शाळेत घडलेल्या प्रकारानंतर शहरातील खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे शहरातील रायन इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी करूनही व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याचा पालकांचा आरोप आहे.
दिल्ली येथील रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्याच्या हत्येचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शाळेच्या सीईओविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर संस्थेच्या सर्वच शाळा व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत. मात्र असा प्रकार इतर कुठे घडू नये याकरिता पालक आक्रमक झाले आहेत. याकरिता सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल शाळेविरोधात मंगळवारी पालकांचा मोर्चा निघणार आहे.
सदर शाळा व्यवस्थापनाबाबत पालकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण होणे, शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभे करणे असे प्रकार शाळेत घडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता शाळेत, वर्गात सीसीटीव्ही बसवावेत अशी पालकांनी यापूर्वीच मागणी केलेली आहे. परंतु शाळा व्यवस्थापन त्याचे गांभीर्य घेत नसल्याचा पालकांचा आरोप आहे. दिल्ली येथील शाळेत असाच निष्काळजीपणा चिमुकल्या विद्यार्थ्याच्या जिवावर बेतल्याचाही पालकांचा आरोप आहे. यामुळे अशा प्रकारची दुसरी घटना घडू नये याकरिता शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी पालकांकडून शाळेबाहेर आंदोलन केले जाणार आहे.
पनवेलमधील शाळेच्या छतावरून विद्यार्थी पडून मृत पावल्याची घटना गतवर्षी घडलेली आहे, तर नेरुळमधील शाळेतच शिक्षकाने अतिप्रसंग केल्याची तक्रार विद्यार्थिनीने केलेली आहे. सातत्याने घडणाºया अशा प्रकारांमुळे पालकांना शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांची देखील चिंता सतावत आहे.
ही बाब गांभीर्याने घेवून शिक्षण मंडळाकडून खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची सक्ती केली जावी, अशी मागणी होत आहे.

गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात इयत्ता दुसरीत शिकणाºया प्रद्युम ठाकूरचा (७) मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मुलाची निर्घृण हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले असून देशातील विविध भागात रायन इंटरनॅशनल शाळा प्रशासनाच्या विरोधात पालकांचा आक्र ोश पहावयास मिळत आहे. सोमवारी खारघर सेक्टर ११ मधील रायन शाळेमध्ये पालकांनी आंदोलन करीत शाळा प्रशासनाला जाब विचारला. यावेळी नगरसेवक अभिमन्यू पाटील, खारघरचा राजा मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी घटनास्थळी धाव घेत पालकांची समजूत काढत शाळा व्यवस्थापनाला लेखी पत्र दिले. खारघरमधील एकूण २२ शाळांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना खारघर पोलिसांच्या वतीने दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे यांनी दिली.

Web Title: Students' security questionnaire on the anvil, Delhi fall victim to rape, Ryan International School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.