पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत वर्धापन दिनाचे औचित्य साधून पनवेल शहरातील व्ही. के. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन तेथील कामकाजाची, शस्त्रांची प्रत्यक्ष माहिती घेतली. पोलीस ठाण्यात चालणारे कामकाज, विविध कायदे, शस्त्रागार, कैद्यांची रूम, विविध अधिकाऱ्यांचे कक्ष, संगणक कक्ष, कंट्रोल रूम, ट्रेझरी रूम, रेकॉर्ड रूम, आरोपींकडून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वापरण्यात येणारे वेगवेगळे हातखंडे यांची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे, पोलीस निरीक्षक गवळी व इतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक शंका-कुशंकांचे निरसन करून घेतले. कित्येक विद्यार्थी प्रथमच पोलीस ठाण्यात येत असल्याने त्यांच्या मनात भीती व खाकीचा धाक होता. परंतु पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांशी मोकळेपणाने बोलल्यावर त्यांचा धाक निघून गेला व ते खुलेपणाने बोलू लागले, शस्त्रांबाबत त्यांना कुतूहल होते. कित्येकांनी यावेळी विविध शस्त्रे हाताळली.(वार्ताहर)
विद्यार्थ्यांनी घेतली पोलिसांच्या कामाची माहिती
By admin | Published: November 18, 2016 3:52 AM