शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

खांदेश्वर स्थानकातील सब-वे कायमच पाण्यात

By admin | Published: September 23, 2016 3:36 AM

अनंत चतुर्दशीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पनवेल परिसरातील सखल भागाबरोबरच अंतर्गत रस्ते, महामार्गावरही पाणीच पाणी साचले आहे.

अरुणकुमार मेहत्रे , कळंबोलीअनंत चतुर्दशीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पनवेल परिसरातील सखल भागाबरोबरच अंतर्गत रस्ते, महामार्गावरही पाणीच पाणी साचले आहे. त्याचबरोबर खांदेश्वर रेल्वेस्थानकातील सब-वे सुध्दा पाण्यात गेल्याने प्रवाशांची त्रेधातिरपीट उडत आहे. स्थानकातील सब-वेमध्ये साचलेल्या पाण्याचा दिवसातून दोनदाच उपसा केला जात असल्याने इतर वेळी प्रवाशांना पाण्यातूनच वाट काढत जावे लागते. पाऊस असो वा नसो गेल्या दोन महिन्यांपासून खांदेश्वर स्थानकातील सबवे पाण्यात असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. वारंवार तक्रार करूनही रेल्वे तसेच सिडकोकडून लक्ष दिले जात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, नवीन पनवेल येथील हजारो नागरिक दररोज खांदेश्वर स्थानकातून प्रवास करतात. मात्र रोजच सब-वेतील पाण्यातून जावे लागत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. खांदेश्वर रेल्वेस्थानक सध्या समस्यांच्या चक्र व्यूहात सापडले आहे. बडा घर पोकळ वासा या उक्तीप्रमाणे हे स्थानक बाहेरून चकाचक दिसत असले तरी आतमधील परिस्थिती अतिशय बिकट आहे. नियोजित वसाहतींबरोबरच सुनियोजित रेल्वेस्थानक असा प्रचार सिडको करीत आहे, मात्र हे स्थानक बांधताना आपत्ती व्यवस्थापन त्याचबरोबर इतर गोष्टीचे योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे स्थानक कायमच समस्यांच्या गर्तेत अडकलेले दिसते. फलाटावर जाण्यासाठी सबवे बांधण्यात आले आहे. मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजनच न झाल्याने पावसाळ्याचे चारही महिने सबवे पाण्यात असतो. पाऊस थांबला तरी येथील पाण्याचा निचरा काही थांबत नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. सबवेमध्ये जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांच्या मध्यभागी असलेले रेलिंग तुटलेले आहेत. त्यामुळे ट्रेन पकडण्याच्या गडबडीत असलेले प्रवासी अनेकदा पाय घसरून पडतात. त्यामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गेल्या तीन दिवसांपासून पनवेल परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खांदेश्वरमधील सब-वेमध्ये गुडघाभर पाण्यातून प्रवाशांना जावे लागले. तीनही दिवस सकाळीच सब -वेत कमरेइतके पाणी साचले होते. पाण्यातून जाण्याशिवाय प्रवाशांकडे अन्य पर्याय नाही. सबवेमध्ये पाणी साचत असल्याने अनेक प्रवासी फलाटालगत असलेल्या अवघड वाटेवरून जाणे पसंत करतात. मात्र रात्रीच्यावेळी ही वाट धोकादायक ठरत आहे. यासंदर्भात सिडको-रेल्वे प्रकल्प कार्यालयात संपर्क साधला असता तेथून जबाबदार अधिकाऱ्याची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.