नेरळ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. हा गुढीपाडवा मंगळवारी साजरा होत आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात असल्याने घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. यानिमित्त पंचांग, साखरेच्या गाठ्या, फुलांची माळ, तांब्या, कडुलिंबाची फांदी, आंब्याची पाने, तोरण, नारळ, बांबूची काठी आदी वस्तूंनी कर्जत, नेरळ, कशेळे, कडाव बाजारपेठ सजलेल्या पाहायला मिळत असून नागरिकांनी खरेदी मोठी गर्दी केली आहे.गुढीला खरा मान असतो साखरेच्या गाठ्यांचा आणि फुलांच्या माळांचा. त्यामुळे बाजारपेठेत पांढऱ्या, पिवळ्या, केशरी रंगाच्या गाठ्या पाहायला मिळत आहेत. या गाठ्यांना मोठी मागणी असल्याने गाठ्यांचा भाव वाढला आहे. गुढीपाडव्याला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. सोन्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांची दुकानातील गर्दी प्रचंड वाढली आहे. उन्हाचा तडाखा जास्त असल्याने दुपारी गर्दी कमी असते; परंतु सकाळी आणि सायंकाळी बाजारपेठांत मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. तसेच नवीन गाड्या, इतर घरगुती वस्तू खरेदीसाठी बाजारपेठांत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तसेच कर्जत तालुक्यात अनेक गावांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्याची परंपरा असल्याने दिंडी, लेझीम पथक, ढोल पथक तसेच पारंपरिक वेशातील नागरिकही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सर्वत्र गुढीपाडव्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (वार्ताहर)कडुलिंब खाण्याची परंपरागुढीपाडव्याला कडुलिंब खाण्याची परंपरा आहे. त्याचे कारण असे की कडुलिंबाच्या सेवनाने आपली पचनक्रि या सुधारते. त्यामुळे ही वनस्पती आरोग्यदायक, आरोग्यवर्धक आहे. पित्तनाश करते. त्वचा रोग बरे करते, धान्यातील कीड थांबवते असे अनेक औषधी गुण या कडुलिंबामध्ये आहेत. काळानुसार झालेला बदल पूर्वी गुढीवर तांब्या किंवा कलश, जाड तांब्या पितळेचे पात्र ठेवले जात असे. त्यांची जागा आता स्टेनलेस स्टीलच्या पात्रांनी घेतली आहे.
गुढीपाडव्यासाठी सजली बाजारपेठ
By admin | Published: March 27, 2017 6:23 AM