नवी मुंबई : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाविषयी सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरी आरोग्य केंद्रांची दुरवस्था, ऐरोली व नेरूळमध्ये सर्वसाधारण रुग्णालय सुरू करण्यात आलेले अपयश व सुपरस्पेशालिटी उपचारामधील त्रुटींवरून प्रशासनावर सडकून टीका करण्यात आली. हिरानंदानी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत किती रुग्णांना लाभ मिळाला याचा वर्षनिहाय व नावासह अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली.रुग्णालयीन साहित्य खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी आला होता. या प्रस्तावावर चर्चा करताना नगरसेवकांनी नागरी आरोग्य केंद्र, प्रथम संदर्भ रूग्णालय, माता बाल रूग्णालयामध्ये उपचारासाठी जाणाऱ्या शहरवासीयांना किती त्रास सहन करावा लागतो हे निदर्शनास आणून दिले. हिरानंदानी- फोर्टीज रूग्णालयामध्ये आतापर्यंत किती रूग्णांवर उपचार करण्यात आले. ८०० रूग्णांवर प्रत्येक वर्षी उपचार होतात का, झाले असल्यास त्याचा तपशील सादर करण्याची मागणी करण्यात आली. सुपरस्पेशालिटीसाठी रूग्ण संदर्भित करताना उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात यावी. महापालिकेने सुपरस्पेशालिटीचा करार हिरानंदानीबरोबर केला होता, परंतु त्यांनी ते फोर्टीजला विकले. आता फोर्टीज ते मनीपाल समूहाला देण्याची चर्चा आहे. याविषयी वस्तुस्थिती नक्की काय आहे, त्यांचा करार रद्द करण्यासाठीच्या कार्यवाहीचे काय झाले अशी विचारणाही करण्यात आली. महापालिकेने जेव्हापासून रूग्ण संदर्भित करण्याचे धोरण निश्चित केले तेव्हापासून वर्षनिहाय उपचार घेतलेल्या रूग्णांचा अहवाल पुढील स्थायी समितीमध्ये देण्याचा आग्रह नगरसेवकांनी केला.महापालिकेने ऐरोली व नेरूळमध्ये रूग्णालयाची इमारत उभी केली आहे. ंपरंतु अद्याप तेथे सर्वसाधारण रूग्णालय सुरू केलेले नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांमधील गळती थांबविण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक नवीन गवते यांनी दिघावासीयांच्या आरोग्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. ऐरोली रूग्णालय अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.आरोग्य विभागाच्या कामकाजाविषयी सर्वच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. आरोग्य अधिकारी दयानंद कटके यांनी डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे ऐरोली व नेरूळ रूग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करता येत नसल्याचे स्पष्ट केले.रूग्णालयासाठी खरेदी केलेल्या उपकरणांची वापरापूर्वीच गॅरंटी संपली आहे. वाशी रूग्णालयातील मेडिकल बंद असून रूग्णांची गैरसोय होत आहे. तुर्भे रूग्णालयाच्या दुरूस्तीनंतर संरचनात्मक अहवाल सभागृहाला सादर करावे.- देविदास हांडे पाटील, नगरसेवक राष्ट्रवादी काँगे्रसनागरी आरोग्य केंद्रांवर पत्र्याचे शेड उभारण्याविषयीच्या मागणीचा प्रशासनाने सकारात्मक विचार करावा. नगरसेवकांच्या सूचनांचा आदर करावा व एकाच ठिकाणी ८ ते १० वर्षांपासून काम करणाºया कर्मचाºयांची तत्काळ बदली करण्यात यावी.- सुरेश कुलकर्णी,स्थायी समिती सभापतीहिरानंदानी - फोर्टीज सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत किती रूग्णांवर उपचार करण्यात आले याचा वर्षनिहाय तपशील स्थायी समितीसमोर करावा व उपचारांचा बॅकलॉग शिल्लक असल्यास तो भरण्यात यावा.- नामदेव भगत,नगरसेवक, शिवसेनापावणे येथील नागरी आरोग्य केंद्राला गळती लागली आहे. उपचारासाठी येणाºया रूग्णांची गैरसोय होत आहे. इमारतीमध्ये पाणी येत असून प्रशासनाने तत्काळ पत्र्याचे शेड उभारावे.- मनीषा भोईर, नगरसेविका प्रभाग ४८
सुपरस्पेशालिटी उपचारांचा अहवाल सादर करा; लोकप्रतिनिधींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:50 AM