गौण खनिज उत्खननातून राज्य होणार मालामाल, तिजोरीत जमा होणार ७२९५ कोटी, कोकणातून सर्वाधिक उत्पन्न

By नारायण जाधव | Published: July 27, 2023 03:58 PM2023-07-27T15:58:21+5:302023-07-27T15:58:44+5:30

Navi Mumbai: जमीन महसूल आणि रेती, खडीसह इतर खनिजांच्या उत्खननापासून राज्य यंदा मालामाल होणार आहे. वित्त विभागाने यंदा महसूल विभागास गौण खनिजांच्या उत्खननापासून तब्बल ७२९५ कोटी १० लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे.

Subsidiary mineral mining will bring wealth to the state, 7295 crores will accumulate in the treasury, highest income from Konkan | गौण खनिज उत्खननातून राज्य होणार मालामाल, तिजोरीत जमा होणार ७२९५ कोटी, कोकणातून सर्वाधिक उत्पन्न

गौण खनिज उत्खननातून राज्य होणार मालामाल, तिजोरीत जमा होणार ७२९५ कोटी, कोकणातून सर्वाधिक उत्पन्न

googlenewsNext

- नारायण जाधव
नवी मुंबई : जमीन महसूल आणि रेती, खडीसह इतर खनिजांच्या उत्खननापासून राज्य यंदा मालामाल होणार आहे. वित्त विभागाने यंदा महसूल विभागास गौण खनिजांच्या उत्खननापासून तब्बल ७२९५ कोटी १० लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. यात सर्वाधिक विकासकामे सुरू असलेल्या महामुंबईसह काेकण विभागाला राज्यात सर्वाधिक ३३९५ कोटींचे लक्ष्य दिले आहे. यात जमीन महसुलातून कोकण विभागाचे २७९३.१६ कोटी आणि गौण खनिजांच्या उत्खननातून ६०२ कोटी असे एकूण ३३९५ कोटी १६ लाखांचे उद्दिष्ट आहे.

राज्य शासनाला २०२३-२४ या वर्षांत जमीन महसूल आणि रेती, खडीसह इतर खनिजांच्या उत्खननापासून कोणत्या महसूल विभागास किती उत्पन्न मिळेल, याचा प्रस्ताव वित्त विभागाने महसूल विभागास दिला आहे. त्यानुसार राज्यात कोकण विभागानंतर पुणे विभागास सर्वाधिक १०७३ कोटी ६० लाखांचे उद्दिष्ट दिले आहे. यात जमीन महसुलातून ५५० कोटी आणि गौण खनिज उत्खननापासूनच्या ५२३ कोटी ६० लाख रुपयांचा समावेश आहे. सर्वांत कमी ४९६ कोटी ४० लाखांचे उद्दिष्ट अमरावती महसूल विभागास दिले आहे.

विकासकामांमुळे कोकणला मोठे लक्ष्य
कोकण विभागात राज्यातील सर्वाधिक विकासकामे सुरू असलेला महामुंबईचा परिसर मोडतो. येथे जमिनीला सोन्याचा भाव आहे. याशिवाय बिल्डरांचे मोठमोठे प्रकल्प, टाऊनशिपसह एमएआरडीए, सिडको, एमएसआरडीसह विविध महापालिकांकडून सुरू असलेले मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल, सागरी पूल, कोस्टल रोड, महामार्ग, ग्रोथ सेंटर, रेल्वे मार्ग, विमानतळ आणि बुलेट ट्रेनची कामे या भागात सुरू आहेत. दगडखाणी, रेतीचे उत्खनन या भागात मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यामुळेच कोकण विभागाला गौण खनिज उत्खननापासूनच्या उत्पन्नासाठी मोठे उद्दिष्ट दिल्याचे सांगण्यात येत आहे.

असा मिळणार विभागनिहाय महसूल (आकडे कोटीत)
विभागाचे नाव - जमीन महसूल - गौण खनिज उत्खनन

कोकण विभाग - २७९३.१६ - ६०२ - ३३९५.१६
नाशिक विभाग - २८९.८० - ३६९.६० - ६५९.४०
पुणे विभाग - ५५०.०० - ५२३.६० - १०७३. ६०
औरंगाबाद विभाग - १८०.५० - ५०९.६० - ६९०.१०
अमरावती विभाग - १५४.८० - ३४१.६० - ४९६.४०
नागपूर - २८३.१० - ४५३.६० - ७३६.७०
जमाबंदी - भूमिअभिलेख - २४३.७४ - ०० - ०० 
एकूण - ४४९५.१० - २८०० - ७२९५.१०

Web Title: Subsidiary mineral mining will bring wealth to the state, 7295 crores will accumulate in the treasury, highest income from Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.