- नारायण जाधवनवी मुंबई : जमीन महसूल आणि रेती, खडीसह इतर खनिजांच्या उत्खननापासून राज्य यंदा मालामाल होणार आहे. वित्त विभागाने यंदा महसूल विभागास गौण खनिजांच्या उत्खननापासून तब्बल ७२९५ कोटी १० लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. यात सर्वाधिक विकासकामे सुरू असलेल्या महामुंबईसह काेकण विभागाला राज्यात सर्वाधिक ३३९५ कोटींचे लक्ष्य दिले आहे. यात जमीन महसुलातून कोकण विभागाचे २७९३.१६ कोटी आणि गौण खनिजांच्या उत्खननातून ६०२ कोटी असे एकूण ३३९५ कोटी १६ लाखांचे उद्दिष्ट आहे.
राज्य शासनाला २०२३-२४ या वर्षांत जमीन महसूल आणि रेती, खडीसह इतर खनिजांच्या उत्खननापासून कोणत्या महसूल विभागास किती उत्पन्न मिळेल, याचा प्रस्ताव वित्त विभागाने महसूल विभागास दिला आहे. त्यानुसार राज्यात कोकण विभागानंतर पुणे विभागास सर्वाधिक १०७३ कोटी ६० लाखांचे उद्दिष्ट दिले आहे. यात जमीन महसुलातून ५५० कोटी आणि गौण खनिज उत्खननापासूनच्या ५२३ कोटी ६० लाख रुपयांचा समावेश आहे. सर्वांत कमी ४९६ कोटी ४० लाखांचे उद्दिष्ट अमरावती महसूल विभागास दिले आहे.
विकासकामांमुळे कोकणला मोठे लक्ष्यकोकण विभागात राज्यातील सर्वाधिक विकासकामे सुरू असलेला महामुंबईचा परिसर मोडतो. येथे जमिनीला सोन्याचा भाव आहे. याशिवाय बिल्डरांचे मोठमोठे प्रकल्प, टाऊनशिपसह एमएआरडीए, सिडको, एमएसआरडीसह विविध महापालिकांकडून सुरू असलेले मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल, सागरी पूल, कोस्टल रोड, महामार्ग, ग्रोथ सेंटर, रेल्वे मार्ग, विमानतळ आणि बुलेट ट्रेनची कामे या भागात सुरू आहेत. दगडखाणी, रेतीचे उत्खनन या भागात मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यामुळेच कोकण विभागाला गौण खनिज उत्खननापासूनच्या उत्पन्नासाठी मोठे उद्दिष्ट दिल्याचे सांगण्यात येत आहे.
असा मिळणार विभागनिहाय महसूल (आकडे कोटीत)विभागाचे नाव - जमीन महसूल - गौण खनिज उत्खननकोकण विभाग - २७९३.१६ - ६०२ - ३३९५.१६नाशिक विभाग - २८९.८० - ३६९.६० - ६५९.४०पुणे विभाग - ५५०.०० - ५२३.६० - १०७३. ६०औरंगाबाद विभाग - १८०.५० - ५०९.६० - ६९०.१०अमरावती विभाग - १५४.८० - ३४१.६० - ४९६.४०नागपूर - २८३.१० - ४५३.६० - ७३६.७०जमाबंदी - भूमिअभिलेख - २४३.७४ - ०० - ०० एकूण - ४४९५.१० - २८०० - ७२९५.१०