सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 11:40 PM2019-03-05T23:40:55+5:302019-03-05T23:41:01+5:30
सायन-पनवेल महामार्गावरील नेरु ळ येथे असलेल्या चार भुयारी मार्गांची महापालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती.
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील नेरु ळ येथे असलेल्या चार भुयारी मार्गांची महापालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरु स्तीनंतर देखील या भुयारी मार्गांचा गैरवापर होत असल्याने तसेच विविध समस्या उद्भवत असल्याने नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळला होता. अखेर भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत.
सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असून, महामार्ग ओलांडणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील मोठी आहे. महामार्ग ओलांडताना अनेक नागरिकांचे अपघात झाले आहेत, त्यामुळे महामार्गाचे रुं दीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात टाळण्यासाठी नेरु ळ एलपी येथे २, नेरु ळ एस.बी.आय. कॉलनी आणि उरण फाटा या ठिकाणी प्रत्येकी एक भुयारी मार्ग बनविले होते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या भुयारी मार्गांचे काम पूर्ण केले नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते अर्धवट अवस्थेत होते.
अनेक वर्षे पडीक पडल्याने भुयारी मार्गांत सांडपाणी आणि कचरा साचला होता, त्यामुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. तसेच हे भुयारी मार्ग गर्दुल्ल्यांचा अड्डादेखील बनला होता. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानामध्ये महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट बांधलेल्या या चारही भुयारी मार्गांची दुरु स्ती करून सदरचे भुयारी मार्ग सुरू केले होते.
चारही भुयारी मार्गांची सुधारणा करण्याच्या कामासाठी महापालिकेने तब्ब्ल ४३ लाख रु पयांचा खर्च केला होता. दुरु स्तीनंतर देखील भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले असून, मद्यपी आणि जुगार खेळणाऱ्यांनी अड्डा बनविला होता, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा झाल्याने नागरिकांनी या भुयारी मार्गाचा वापर करणे टाळले होते. पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लाखो रु पये खर्च करूनही भुयारी मार्गाच्या अडचणी न सुटल्याने अखेर भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत.
>महामार्गावरील भुयारी मार्ग सुरू करण्याची मागणी
सायन पनवेल महामार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. मार्ग ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी नेरूळ परिसरात लाखो रुपये खूर्चन नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून चार भुयारी मार्ग बांधण्यात आले. मात्र सध्या ते बंदावस्थेत आहेत. भुयारी मार्गाचे अपूर्णावस्थेतील काम पूर्ण करून ते लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.