चळवळीमुळेच स्वच्छतेत यश; देशात तिसऱ्या क्रमांकावर झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:17 PM2020-01-01T23:17:13+5:302020-01-01T23:17:15+5:30

लोकसहभाग वाढविण्यास दिले प्राधान्य

Success in cleanliness due to movement; The third highest jump in the country | चळवळीमुळेच स्वच्छतेत यश; देशात तिसऱ्या क्रमांकावर झेप

चळवळीमुळेच स्वच्छतेत यश; देशात तिसऱ्या क्रमांकावर झेप

googlenewsNext

नवी मुंबई : स्वच्छता सर्वेक्षण २०२० च्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये नवी मुंबईने राज्यात प्रथम व देशात तिसºया क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या तीनमध्ये येण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून, हा क्रमांक टिकविण्यासाठी महापालिकेने स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले आहे. लोकसहभाग वाढविण्यावरही लक्ष दिले असून, प्रत्येक नागरिकाने या चळवळीमध्ये सहभाग घ्यावा व अंतिम स्पर्धेत तिसरा किंवा अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

स्वच्छ भारत अभियानामध्ये गतवर्षी नवी मुंबई महानगरपालिकेने देशात सातवा क्रमांक मिळविला होता. २०२० च्या अभियानामध्ये पहिल्या तीनमध्ये नंबर मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी काम सुरू केले असून, पहिल्या सहा महिन्यांमध्ये त्याला यश आले आहे. शासनाने स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या लीगची सुरुवात केली आहे. पहिल्या दोन तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये नवी मुंबईने सातव्या क्रमांकावरून थेट तिसºया क्रमांकावर झेप घेतली आहे. अभियानामधील ही कामगिरी लक्षवेधी आहे. यावर्षीसाठीची अंतिम स्पर्धा अद्याप बाकी आहे.

पहिल्या सहा महिन्यांमध्ये महापालिका प्रशासनाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. विद्यार्थ्यांना स्वच्छतादूत समजून शाळांमध्ये चित्रकला, निबंध व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यात प्रशासनास यश आले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे. स्वच्छ सोसायटी स्पर्धा आयोजित केली आहे. ज्या गृहनिर्माण सोसायट्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्या सोसायट्यांची माहिती इतरांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीने या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहनही महापालिकेने केले आहे.

स्पर्धेदरम्यान शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या भिंती व संरक्षण भिंतींवर स्वच्छतेचे संदेश रेखाटण्यात आले आहेत. चित्रांच्या माध्यमातून शहराच्या प्रगतीचा आलेख मांडण्यात आला आहे. ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
घरामधील चप्पल व इतर कचरा संकलित करण्यासाठीची सुविधा निर्माण केली आहे. सार्वजनिक प्रसाधनगृहांची संख्या वाढविण्याबरोबर आहेत त्यांची स्वच्छता चांगली राहील यावरही लक्ष केंद्रित केले आहे.

झोपडपट्टी परिसरामध्येही जनजागृती केली आहे. महापालिका प्रशासनाने स्वच्छतेच्या स्पर्धेला चळवळीचे स्वरूप मिळवून दिले आहे. यामुळेच पहिल्या सहा महिन्यांत तिसºया क्रमांकावर झेप घेतली आहे. आता प्रशासन व लोकप्रतिनिधींपेक्षा नागरिकांची जबाबदारी वाढली आहे. अंतिम स्पर्धेत तिसरा क्रमांक कायम ठेवण्यासाठी व अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.

शहरात स्वच्छताविषयी सुरू असलेली कामे
गृहनिर्माण सोसायटींच्या व इतर संरक्षण भिंतींची रंगरंगोटी
रस्ते व दुभाजकांवर पांढरे, काळे व पांढरे पट्टे मारण्यास सुरुवात
नागरिकांमध्ये स्वच्छता अभियानाविषयी जनजागृती
शाळांमध्ये चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धेचे आयोजन
झोपडपट्टी परिसरामध्ये विशेष जनजागृती
ओला व सुका कचºयाचे वर्गीकरण करण्यावर लक्ष केंद्रित
पदपथांवर कचरा टाकण्यासाठी बिन्स बसविल्या आहेत
प्रसाधनगृहांची स्वच्छता ठेवण्यास प्राधान्य
गृहनिर्माण सोसायट्यांसाठी स्पर्धेचे आयोजन
रुग्णालय, शाळा, हॉटेलचालकांचा सहभागही वाढविला
घरांमधील जुन्या चप्पल व इतर वस्तू संकलनासाठीही विशेष यंत्रणा
चॉकलेटचे कागद व इतर छोटा कचरा संकलनासही प्राधान्य

लोकसहभागाला विशेष महत्त्व
स्वच्छता अभियानाच्या अंतिम स्पर्धेमध्ये लोकसहभागाला विशेष महत्त्व आहे. नागरिकांनी अभियानाविषयी फिडबॅक देणे आवश्यक आहे. यामुळे नागरिकांमध्ये किती जागरूकता निर्माण झाली आहे हे लक्षात येणार आहे. यामुळे स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेण्याबरोबर अ‍ॅपवरून प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे.

केंद्राचे पथक देणार भेट
अंतिम स्पर्धेदरम्यान जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये केंद्र सरकारचे पथक नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहे. पथक शहरातील स्वच्छताविषयी कामगिरीचा आढावा घेणार आहे. नागरिकांशीही संवाद साधून माहिती घेणार आहेत. यामुळे शहरवासीयांनी जास्तीत जास्त स्पर्धेत सहभाग घ्यावा व याविषयी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी.

कचरा वर्गीकरणास हवे सहकार्य
नागरिकांनी घरातील ओला व सुका कचरा वेगळा करावा. स्वच्छता अभियानामध्ये कचरा वर्गीकरणाला विशेष महत्त्व आहे. घरामधूनच कचºयाचे वर्गीकरण केले तर स्पर्धेमधील अव्वल क्रमांक टिकविण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिकांनी कचरा वर्गीकरणास प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.

स्वच्छता अभियानाच्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला देशात तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. आतापर्यंत सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. अंतिम स्पर्धेमध्येही हे यश कायम ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महानगरपालिका

स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पुढील काळात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिकाने त्यांचे योगदान दिले तर नवी मुंबई पालिकेस अंतिम स्पर्धेतही यश मिळविला येईल.
- तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा

Web Title: Success in cleanliness due to movement; The third highest jump in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.