नवी मुंबई - अपोलो रुग्णालयातर्फे 15 तासांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जन्मताच क्रिटिकल ऑर्टिक व्हॉल्व्ह स्टेनोसिस असलेल्या या बाळावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबातील 22 बालकांवर अपोलो रुग्णालयातर्फे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यापैकी 11 बालकांवर ओपन हार्ट शस्त्रक्रिया तर 11 बालकांवर इंटरव्हेन्शनल उपचार करण्यात आले. राज्याच्या विविध भागातली ही मुले आहेत.
त्यापैकी सर्वाधिक लहान बालक हे केवळ पंधरा तासाचे होते. जन्मताच त्याच अंग निळे पडले होते. यामुळे त्याच्यावर पंधरा तासाच्या आत उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. रुग्णालयाच्या वतीने सुमारे 66 बालकांवर मोफत पेडिअॅट्रिक कार्डिअॅक रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. याचा लाभ अधिकाधिक गरजूंनी घेण्याचे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहेत.