बाळाच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया
By admin | Published: April 12, 2016 01:24 AM2016-04-12T01:24:53+5:302016-04-12T01:24:53+5:30
श्रीवर्धनमधील रिक्षाचालकाच्या अवघ्या दोन महिन्यांच्या मुलाला हृदयाशी संबंधित आजार होता. मात्र नवी मुंबईतील तेरणा सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
पनवेल : श्रीवर्धनमधील रिक्षाचालकाच्या अवघ्या दोन महिन्यांच्या मुलाला हृदयाशी संबंधित आजार होता. मात्र नवी मुंबईतील तेरणा सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन दिले.
रिक्षाचालक उदेश कार्डेकरच्या पत्नीने वेळेआधीच सातव्या महिन्यात मुलाला जन्म दिला. त्यामुळे बाळ अशक्त व कमी वजनाचे होते. सुरुवातीला बाळावर श्रीवर्धन येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. जन्मत: बाळाच्या फुप्फुसाच्या झडपा अरुंद (कोंगेन्टीअल पल्मोनरी वॉल्व स्टेनोसीस) असल्याने डॉक्टरांनी ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला.
मात्र रमेशचे उत्पन्न कमी असल्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्च परवडण्याजोगा नव्हता. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत उपचार मिळावे यासाठी बाळाला तेरणा सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बाळाचे वय व वजन लक्षात घेता पालकांशी चर्चा केल्यानंतर रुग्णालयातील बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांनी एन्जिओग्राफिक बलून उपचार पद्धतीचा मार्ग स्वीकारण्याचे सुचवले. अखेर मार्चअखेरीस बाळावर बलून पल्मोनरी वाल्वोप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली.
बाळाच्या पायांच्या नसांतून बलून आत टाकला आणि फुप्फुसाची बंद झडप उघडण्याकरिता तो हृदयापर्यंत नेण्यात आला. नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच अशी उपचार प्रक्रि या करण्यात आली. अवघ्या ३० मिनिटांत ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
- डॉ. भूषण चव्हाण,
तेरणा सह्याद्री रुग्णालय.