शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

नेरूळ-उरण मार्गावर लोकलची यशस्वी चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:33 PM

नेरूळ-उरण मार्गावरील खारकोपरपर्यंत लोकल सेवा दृष्टिपथात आली आहे.

नवी मुंबई : नेरूळ-उरण मार्गावरील खारकोपरपर्यंत लोकल सेवा दृष्टिपथात आली आहे. रेल्वे व सिडकोच्या पथकाने गुरुवारी या मार्गावर प्रत्यक्ष लोकल चालवून चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाली असून, पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष सेवा सुरू होईल, असा विश्वास सिडकोच्या सूत्राने व्यक्त केला आहे.नेरूळ-उरण लोकलमुळे या पट्ट्यातील विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे सिडकोने या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्याबाबत विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या टॉवर व्हॅगनमधून बेलापूर ते खारकोपर स्थानकापर्यंतच्या कामांची पाहणी केली होती. त्यानंतर गेल्या शुक्रवारी रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या पथकाने नेरूळ-खारकोपर-बेलापूर मार्गाची चाचणी घेतली होती. गुरुवारी या मार्गावर प्रत्यक्षात बारा डब्यांची लोकल चालविण्यात आली. या वेळी रेल्वेच्या संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही चाचणी यशस्वी झाली असली तरी आणखी काही चाचण्या करावयाच्या आहेत. एकूणच रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या संमती नंतरच नेरूळ ते खारकोपरपर्यंत लोकल प्रत्यक्षात धावेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.